Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 26:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 त्यांचे बांधव वीर असून आपापल्या पितृकुळांचे मुख्य होते; ते दोन हजार सातशे होते. त्यांना दावीद राजाने देवाच्या कार्यासंबंधाने व राजाच्या सर्व कारभारासंबंधाने रऊबेनी, गादी, व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांच्यावर देखरेख करण्याच्या कामावर नेमले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे दोन हजार सातशे नातलग यरीयाला होते. देवाच्या प्रत्येक कार्यासाठी आणि राज्याचे कामकाज यासाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे दोन हजार सातशे जण दावीदाने नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 येरीह कडे 2,700 कुटुंब होते, जे सक्षम असून कुटुंबप्रमुख होते. दावीद राजाने त्यांना रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र यांच्या परमेश्वरा संबंधित धार्मिक व सामाजिक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमले.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 26:32
7 Iomraidhean Croise  

यार्देनेच्या पूर्वेस राहणारे रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांच्यातले एक लक्ष वीस हजार लोक युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन आले.


“तुम्ही लेव्यांच्या पितृकुळांतील प्रमुख पुरुष आहात; तुम्ही आपल्या भाऊबंदांसह शुचिर्भूत व्हा, मग इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या कोशासाठी जे स्थळ मी तयार केले आहे तेथे तो नेऊन पोचवा.


लेव्याच्या पितृकुळातील मुख्य पुरुष हेच; त्यांची नावे घेऊन शिरगणती केली; ते वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत असत.


ह्यांनीही आपले बांधव अहरोनवंशज ह्यांच्याप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमलेख आणि याजकांच्या व लेव्यांच्या पितृकुळाचे प्रमुख पुरुष ह्यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकल्या; मुख्य पुरुषाचे पितृकुळ त्याच्या कनिष्ठ बांधवांच्या पितृकुळाबरोबर गणले.


इस्राएल लोकांची गणती म्हणजे पितृकुळांतील मुख्य पुरुष, सहस्रपती, शतपती व त्यांचे सरदार ह्यांची आणि जे वर्षभर प्रतिमासी कामावर हजर होते, सुटी मिळाली म्हणजे जात व अशा प्रकारे राजाची सेवाचाकरी करीत त्यांची प्रत्येक वर्गाप्रमाणे गणती चोवीस हजार होती.


पाहा, परमेश्वराविषयीच्या सर्व प्रकरणांत मुख्य याजक अमर्‍या ह्याला तुमच्यावर नेमले आहे, आणि राजासंबंधीच्या सर्व प्रकरणांत यहूदा वंशाचा सरदार जबद्या बिन इस्राएल ह्याला तुमच्यावर नेमले आहे; आणि लेवी हेही तुमच्या दिमतीस असतील. हिंमत धरा, आपले कर्तव्य करा, परमेश्वर भल्यांच्या बरोबर असणार.”


मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना म्हटले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan