Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 26:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 हेब्रोन्यांपैकी हशब्या व त्याचे भाऊबंद एक हजार सातशे हे वीर असून ते यार्देनेच्या पश्‍चिमेस परमेश्वराच्या सर्व सेवेसंबंधाने व राज्याच्या कामगिरीसंबंधाने इस्राएलावर देखरेख करणारे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 हेब्रोनी वंशातला, हशब्या व त्याचे भाऊबंद, एक हजार सातशे शूर वीर, यार्देनेच्या अलिकडे पश्चिमेस, परमेश्वराच्या सेवेसाठी व राजाच्या कामासाठी इस्राएलावर देखरेख करत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 हेब्रोन्यांपैकी: हशब्याह आणि त्याचे नातेवाईक 1,700 सक्षम पुरुष यार्देन नदीच्या पश्चिमेकडील इस्राएलाच्या प्रदेशाचे प्रमुख होते. याहवेहची आणि राजाची सेवा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 26:30
5 Iomraidhean Croise  

कहाथाचे पुत्र अम्रान, इसहार, हेब्रोन व उज्जीएल असे चार;


हेब्रोनाच्या पुत्रांमध्ये यरीया मुख्य; व अमर्‍या दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम् चौथा;


लेवी वंशाचा अधिकारी कमुवेलाचा पुत्र हशब्या; अहरोन वंशाचा अधिकारी सादोक;


पाहा, परमेश्वराविषयीच्या सर्व प्रकरणांत मुख्य याजक अमर्‍या ह्याला तुमच्यावर नेमले आहे, आणि राजासंबंधीच्या सर्व प्रकरणांत यहूदा वंशाचा सरदार जबद्या बिन इस्राएल ह्याला तुमच्यावर नेमले आहे; आणि लेवी हेही तुमच्या दिमतीस असतील. हिंमत धरा, आपले कर्तव्य करा, परमेश्वर भल्यांच्या बरोबर असणार.”


कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan