Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 24:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आणि लेव्यांपैकी नथनेल लेखक ह्याचा पुत्र शमाया ह्याने राजा व अधिकारी, सादोक याजक व अब्याथाराचा पुत्र अहीमलेख आणि लेवी व याजक ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांच्यासमोर त्यांची नावे लिहिली; एक प्रमुख घराणे एलाजाराचे व एक इथामाराचे अशी धरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 लेवी वंशातील नथानेलाचा पुत्र लेखनिक शमायाहने राजाच्या व शासक—याजक सादोक, अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख व याजक आणि लेवीच्या कुटुंबप्रमुखांसमोर—नावनोंदणी केली. एलअज़ारच्या वंशातील एक कुटुंब व इथामारच्या वंशातील एक कुटुंब घेण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 24:6
12 Iomraidhean Croise  

शिशाचे पुत्र अलिहोरेफ व अहीया हे चिटणीस, अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट बखरनवीस (इतिहासलेखक);


अहीटुबाचा पुत्र सादोक आणि अब्याथाराचा पुत्र अबीमलेख हे याजक होते; शवूशा हा चिटणीस होता;


लेव्याच्या पितृकुळातील मुख्य पुरुष हेच; त्यांची नावे घेऊन शिरगणती केली; ते वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत असत.


ह्यांनीही आपले बांधव अहरोनवंशज ह्यांच्याप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमलेख आणि याजकांच्या व लेव्यांच्या पितृकुळाचे प्रमुख पुरुष ह्यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकल्या; मुख्य पुरुषाचे पितृकुळ त्याच्या कनिष्ठ बांधवांच्या पितृकुळाबरोबर गणले.


पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची,


बोजे वाहणार्‍यांवरही ते देखरेख करीत आणि हरप्रकारचे काम करणार्‍यांकडून ते काम करवून घेत; लेव्यांपैकी काही लेखक, कारभारी व द्वारपाळ होते.


हाच एज्रा बाबेलहून गेला; हा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता; त्याचा देव परमेश्वर ह्याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सर्व मनोरथ पूर्ण केला.


मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशीजवळच्या चौकात एकत्र जमले व एज्रा शास्त्री ह्याला म्हणाले, “परमेश्वराने इस्राएल लोकांना विहित केलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या.”


तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्याजुन्या गोष्टी काढणार्‍या गृहस्थासारखा आहे.”


तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन.”


अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या ‘समर्पित भाकरी’ त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा खाण्यास दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan