Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 24:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ह्याप्रमाणे दोन्ही घराण्यांतले पुरुष घेऊन त्यांची चिठ्ठ्या टाकून वाटणी केली; कारण पवित्रस्थानाचा अधिकार व देवाकडची सरदारी एलाजार व इथामार ह्या दोन्ही वंशांतल्या पुरुषांकडे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कोणताही भेदभाव न करता चिठ्ठ्या टाकून विभागण्यात आले, कारण ते एलअज़ार व इथामार या दोन्ही वंशातून घेतलेले मंदिराचे अधिकारी व परमेश्वराचे निवडलेले अधिकारी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 24:5
17 Iomraidhean Croise  

ह्यांनीही आपले बांधव अहरोनवंशज ह्यांच्याप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमलेख आणि याजकांच्या व लेव्यांच्या पितृकुळाचे प्रमुख पुरुष ह्यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकल्या; मुख्य पुरुषाचे पितृकुळ त्याच्या कनिष्ठ बांधवांच्या पितृकुळाबरोबर गणले.


इथामाराच्या वंशजांपेक्षा एलाजाराच्या वंशजांत प्रमुख पुरुष अधिक निपजले; त्यांची वाटणी येणेप्रमाणे झाली : एलाजाराच्या वंशातील पितृकुळांचे प्रमुख सोळा होते, आणि इथामाराच्या वंशातील पितृकुळांप्रमाणे आठ होते.


त्या सर्वांनी, लहानमोठ्यांनी आणि गुरुशिष्यांनी चिठ्ठ्या टाकून आपापली कामे वाटून घेतली.


त्यांतल्या लहानथोरांनी आपापल्या पितृकुळांप्रमाणे एकेका द्वारासंबंधाने चिठ्ठी टाकली.


आणि अजर्‍या बिन हिल्कीया, बिन मशुल्लाम, बिन सादोक, बिन मरायोथ, बिन अहीटूब; हा देवाच्या मंदिराचा शास्ता होता;


सरदारांनी लोकांना, याजकांना व लेव्यांना स्वेच्छार्पणे दिली. देवाच्या मंदिराचे कारभारी हिल्कीया, जखर्‍या व यहीएल ह्यांनी वल्हांडणाच्या यज्ञांसाठी याजकांना दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे व तीनशे बैल दिले.


सराया बिन हिल्कीया बिन मशुल्लाम बिन सादोक बिन मरायोथ बिन अहीटूब हा देवमंदिराचा अधिकारी होता;


पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.


म्हणून मी पवित्र अधिपतींना अपवित्र ठरवले, याकोबाला शापवश व इस्राएलास निंदावश केले आहे.


त्यांनी एकमेकांना म्हटले, “चला, आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपल्यावर ओढवले हे आपल्याला कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली.


तेव्हा कयफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक [व शास्त्री] आणि लोकांचा वडीलवर्ग जमला;


प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांनी येशूला जिवे मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध मसलत केली;


मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.


ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदूकी हे चालून आले;


आणि प्रमुख याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले.


हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले.


शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशवाने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या; त्या ठिकाणी यहोशवाने इस्राएल लोकांना त्यांच्या-त्यांच्या वतनभागांप्रमाणे जमीन वाटून दिली. बन्यामिनाला देण्यात आलेला प्रदेश


Lean sinn:

Sanasan


Sanasan