Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 23:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 चार हजार द्वारपाळ होते; आणि परमेश्वराची स्तोत्रे म्हणणार्‍यांसाठी दाविदाने जी वाद्ये केली होती त्यांवर परमेश्वराचे स्तवन करण्यासाठी चार हजार माणसे नेमली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 चार हजार द्वारपाल होते आणि दावीद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे चार हजार होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 चार हजार लोकांनी मंदिराच्या द्वारपालांचे काम करावे आणि चार हजार लोकांनी मी पुरवठा केलेली वाद्ये वाजवून याहवेहचे स्तुतिगान करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 23:5
23 Iomraidhean Croise  

राजाने रक्तचंदनाच्या लाकडाचे परमेश्वराच्या मंदिराला व राजवाड्याला कठडे केले; त्याचप्रमाणे गाणार्‍यांसाठी त्याच्या वीणा व सारंग्या बनवल्या; असले रक्तचंदनाचे लाकूड आजवर आले नाही की दृष्टीस पडले नाही.


त्यांनी जाऊन नगराच्या वेसकर्‍यांना हाक मारून सांगितले, “आम्ही अरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो, तो पाहा, तेथे एकही मनुष्य नाही; माणसांचा शब्दही नाही. तेथे घोडे व गाढवे बांधून ठेवलेली आहेत; डेरेही जसेच्या तसेच आहेत.”


तसेच ओबेद-अदोम व त्याचे अडुसष्ट भाऊबंद आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम व होसा ह्यांना द्वारपाळ केले.


मग दाविदाने परमेश्वराच्या कोशापुढे सेवाचाकरी करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा गुणानुवाद व उपकारस्मरण करण्यास काही लेवी नेमले;


सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे नित्य उपकारस्मरण व स्तवन करण्यास त्यांना उभे राहावे लागत असे.


वर सांगितलेले गायक लेव्यांच्या पितृकुळातले प्रमुख होते; ते कोठड्यांत राहत; त्यांना इतर काही काम नसे; ते रात्रंदिवस आपल्या कामात गुंतलेले असत.


ते सारंग्या, वीणा व कर्णे वाजवत यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरी आले.


बोजे वाहणार्‍यांवरही ते देखरेख करीत आणि हरप्रकारचे काम करणार्‍यांकडून ते काम करवून घेत; लेव्यांपैकी काही लेखक, कारभारी व द्वारपाळ होते.


दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा द्रष्टा यदूथून ह्यांच्या आज्ञेप्रमाणे आसाफ वंशातले गायक आपापल्या ठिकाणी होते, आणि द्वारपाळ प्रत्येक द्वाराजवळ होते; त्यांना आपले काम सोडून जावे लागले नाही, कारण त्यांचे भाऊबंद जे लेवी त्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली.


त्याने आपला बाप दावीद ह्याच्या नियमानुसार याजकांच्या सेवेचे वर्ग नेमले आणि स्तुती करण्यास व याजकांच्या देखरेखीखाली सेवाचाकरी करण्यास त्याने लेव्यांनाही प्रत्येक दिवसाच्या विधीप्रमाणे त्यांच्या-त्यांच्या कामांवर नेमले; प्रत्येक द्वाराजवळ द्वारपाळांच्या पाळ्या ठरवल्या; कारण देवाचा माणूस दावीद ह्याने अशीच आज्ञा केली होती.


इस्राएल लोक, याजक, लेवी, गायक, द्वारपाळ व नथीनीम ह्यांतले काही जण मिळून अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी यरुशलेमेस गेले.


ह्या प्रकारे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व इतर काही लोक; नथीनीम व सर्व इस्राएल आपापल्या नगरांत राहू लागले. सातवा महिना आला तेव्हा सर्व इस्राएल आपापल्या नगरात होते.


गायन व नृत्य करणारे म्हणतील : “माझे सर्व उगम तुझ्याच ठायी आहेत.”


तुझी पवित्र नगरे वने बनली आहेत; सीयोन रान बनली आहे; यरुशलेम ओसाड झाली आहे.


तुम्ही वीणेच्या सुरावर काहीतरी गात असता; दाविदाप्रमाणे अनेक तंतुवाद्ये बनवता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan