Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 22:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तर आता माझ्या पुत्रा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो, तू कृतार्थ हो, आणि परमेश्वर तुझा देव तुझ्यासंबंधाने म्हणाला आहे त्याप्रमाणे त्याचे मंदिर बांध.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 “आता माझ्या मुला, परमेश्वर तुझ्याबरोबर असो व तुला यशस्वी करो. त्याने तुला सांगितल्याप्रमाणे तू परमेश्वर देवाचे मंदिर बांध.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “आता माझ्या मुला, याहवेह तुझ्याबरोबर असो आणि तुला यश प्राप्त होवो आणि तू ते बांधशील असे त्यांनी सांगितल्याप्रमाणे याहवेह तुझ्या परमेश्वराचे भवन बांध.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 22:11
11 Iomraidhean Croise  

सोने, रुपे, पितळ व लोखंड हे अपरिमित आहे; तर आता उठून कामाला लाग, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”


मग दावीद आपला पुत्र शलमोन ह्याला म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर; भिऊ नकोस, खचू नकोस, कारण परमेश्वर देव, माझा देव तुझ्याबरोबर आहे; परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही, तुला सोडणार नाही.


दाविदाचा पुत्र शलमोन हा आपल्या गादीवर कायम झाला; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; त्याने त्याला अति थोर पदास चढवले.


परमेश्वर हे जे वचन बोलला ते त्याने पुरे केले. मी आपला बाप दावीद ह्याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्राएलाच्या गादीवर बसलो आहे; आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ हे मंदिर मी बांधले आहे.


हे परमेश्वरा, आमच्यासाठी तू शांतता स्थापीत करशील; कारण तू आमच्यासाठी आमची सर्व कार्ये साधली आहेत.


“पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.


प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुमच्याबरोबर कृपा असो.


दावीद आणखी म्हणाला, “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातून सोडवील.” तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”


तुझा घात करण्याचे माझ्या बापाच्या मनात असले तर मी तुला ते कळवून तू सुखरूप जावे म्हणून तुला मी रवाना केले नाही तर योनाथानाचे असेच, किंबहुना ह्याहूनही अधिक अनिष्ट परमेश्वर करो; परमेश्वर जसा माझ्या बापाच्या बरोबर आहे तसाच तो तुझ्याबरोबर असो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan