Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 21:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 यवाब म्हणाला, “लोक कितीही असोत, परमेश्वर त्यांना शतगुणित करो; पण माझे स्वामीराज, हे सर्व स्वामींचे दास आहेत ना? माझे स्वामी हे करायला का सांगतात? इस्राएलावर दोष आणण्यासाठी त्यांनी कारण का व्हावे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 यवाब म्हणाला “परमेश्वर आपले सैन्य आहे त्यापेक्षा शंभर पटीने अधिक वाढवो. पण माझ्या प्रभू राजा, ते सर्व माझ्या धन्याचे सेवा करत नाही का? मग माझ्या धन्याला हे का पाहिजे? इस्राएलावर त्याने दोष का आणावा?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परंतु योआबाने उत्तर दिले, “याहवेह आपल्या सैन्याची शंभरपटीने वाढ करो. माझ्या धनीराजा, ती सर्व आपलीच प्रजा नाही का? मग गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात? इस्राएलवर आपण दोष का आणावा?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 21:3
15 Iomraidhean Croise  

अबीमलेखाने अब्राहामाला बोलावून आणून म्हटले, “तू हे काय केलेस? मी तुझा असा कोणता अपराध केला की तू माझ्यावर व माझ्या राज्यावर असे महापातक आणलेस? करू नये असे वर्तन तू माझ्याशी केलेस.”


यराबामाने जी पातके स्वत: केली व इस्राएलांकडून करवली त्यामुळे परमेश्वर इस्राएलांचा त्याग करील.”


तेव्हा यहोआश राजाने यहोयादा याजक व इतर याजक ह्यांना बोलावून विचारले की, “मंदिराची मोडतोड झाली आहे तिची तुम्ही दुरुस्ती का करत नाही? ह्यापुढे आपल्या ओळखीच्या लोकांपासून पैसे घेऊन ठेवू नका, तर ते मंदिराच्या दुरुस्तीसाठी देऊन टाका.”


हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढण्याची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.”


तथापि राजाज्ञेपुढे यवाबाचे काही चालले नाही, म्हणून यवाब निघून सर्व इस्राएल देशभर फिरून यरुशलेमास आला.


परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो, तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो.


“तू इस्राएल लोकांची खानेसुमारी करशील तेव्हा गणनेसमयी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यांतल्या प्रत्येकाने त्या वेळी आपल्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा.


तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते?”


प्रजावृद्धीत राजाचे वैभव असते; प्रजा नसल्याने अधिपतीचा नाश होतो.


तू राष्ट्रांची वाढ केली आहेस, हे परमेश्वरा, तू राष्ट्रांची वाढ केली आहेस; तू आपला महिमा दाखवला आहेस; तू देशाच्या चतुःसीमा वाढवल्या आहेत.


तुझा वंश रेतीइतका, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणांइतके असते; त्याचे नाव माझ्यासमोरून उच्छेद पावले नसते, ते नष्ट झाले नसते.”


तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, तुम्ही आता आहात त्यापेक्षा सहस्रपट तुम्हांला वाढवो, आणि आपल्या वचनाप्रमाणे तो तुम्हांला आशीर्वाद देवो.


ते गिलाद देशात रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे जाऊन म्हणाले,


माझ्या मुलांनो, असे करू नका; माझ्या कानावर जो बोभाटा येत आहे तो काही ठीक नाही; तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवत आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan