Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 21:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 अर्णान दाविदाला म्हणाला, “ही जमीन आपणाला घ्या, माझ्या स्वामीराजांनी जे काही ठीक दिसेल ते करावे. पाहा, होमबलीसाठी बैल, इंधनासाठी मळणीची औते व अन्नार्पणासाठी गहू ही सर्व मी आपणाला देतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 अर्णान दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामी राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पाहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल, तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे, आणि अन्नार्पणासाठी गहू हे सर्व मी तुम्हास देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या धनीराजांना मनास येईल ते त्यांनी करावे. पाहा, होमार्पणासाठी मी बैल देईन, लाकडासाठी मळणीची आऊते व धान्यार्पणासाठी गहू, मी हे सर्व तुम्हाला देत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 21:23
8 Iomraidhean Croise  

मग तो त्याच्या मागे जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची औते पेटवून त्यांवर मांस भाजले; ते त्याने आपल्या लोकांना दिले, ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलीयाबरोबर गेला व त्याची सेवा करू लागला.


दावीद अर्णानास म्हणाला, “ह्या खळ्याची जागा मला दे; लोकांवरची ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रीत्यर्थ मला एक वेदी बांधायची आहे; पुरे मोल घेऊन ही मला दे.”


दावीद राजा अर्णानाला म्हणाला, “नाही, नाही, मी पुरे मोल देऊन ह्या वस्तू घेईन; कारण जे तुझ्या मालकीचे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही; फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.”


तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल माझ्याकडे पहारेकर्‍यांच्या चौकात आला; तो मला म्हणाला, ‘बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते वतन करून घेण्याचा व सोडवण्याचा हक्क तुझा आहे; तू ते आपल्यासाठी विकत घे.’ तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे.


ती गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर ह्याच्या शेतात जाऊन उभी राहिली; तेथे एक मोठी धोंड होती. मग त्यांनी गाडीची लाकडे फोडून त्या गाईंचा परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली अर्पण केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan