Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 21:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 दाविदाने यवाबाला व लोकांच्या सरदारांना सांगितले, “जा, बैर-शेबापासून दानापर्यंत इस्राएलाची मोजदाद करून मला कळवा म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 दावीद यवाबाला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “जा बैर-शेबापासून दानापर्यंत सर्व इस्राएल लोकांची मोजणी करा आणि मग मला त्यांची एकंदर संख्या माहित व्हावी म्हणून मला परत येऊन अहवाल द्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 म्हणून दावीदाने योआब आणि इतर मुख्य सेनापतींना सांगितले, “जा आणि संपूर्ण इस्राएलींची बेअर-शेबापासून दानापर्यंत शिरगणती करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 21:2
14 Iomraidhean Croise  

नंतर अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले; ती निघून बैर-शेबाच्या रानात भटकत राहिली.


माझी तुला अशी मसलत आहे की, दानापासून बैरशेब्यापर्यंतचे अवघे इस्राएल लोक, समुद्रकिनार्‍यावरील रेतीप्रमाणे अगणित असे एकत्र कर आणि तू स्वतः युद्ध करायला जा.


मग परमेश्वराने इस्राएलात सकाळपासून नेमलेल्या मुदतीपर्यंत मरी पाठवली; आणि दानापासून बैर-शेब्यापर्यंतच्या लोकांपैकी सत्तर हजार लोक मेले.


दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते.


लोकांनी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ यरुशलेमेस येऊन वल्हांडण सण पाळावा असा डांगोरा बैर-शेब्यापासून दानापर्यंत सर्व इस्राएलात पिटवावा असा त्यांनी ठराव केला, ह्या प्रकारे एवढ्या मोठ्या समुदायाने हा सण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळला नव्हता.


गर्व मनुष्याला खाली उतरवतो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो.


प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे.


मग दानापासून बैर-शेबापर्यंतचे सर्व इस्राएल लोक व गिलादातले लोक बाहेर पडले व त्यांची मंडळी एकत्र येऊन मिस्पा येथे परमेश्वरासमोर जमा झाली.


दानापासून बैर-शेबापर्यंत राहणार्‍या सर्व इस्राएल लोकांना माहीत झाले की, शमुवेल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हायचा ठरला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan