Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 21:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 दाविदाने वर दृष्टी केली तो परमेश्वराचा दूत आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन यरुशलेमावर उगारून आकाश व पृथ्वी ह्यांच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले, तेव्हा दावीद व वडील जन ह्यांनी दंडवत घातले; त्या वेळी त्यांनी गोणपाट नेसले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 दावीदाने वर पाहिले व तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा असलेला दिसला. त्याच्या हातात उपसलेली तलवार असून त्याने ती यरूशलेमेवर उगारलेली होती. तेव्हा गोणताट घातलेले दावीद आणि वडील जमिनीकडे तोंड करून खाली पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 दावीदाने वर दृष्टी केली आणि याहवेहच्या दूताला स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या मध्ये यरुशलेमकडे तलवार उगारून उभे असलेले पाहिले, तेव्हा दावीद आणि वडीलजनांनी अंगावर गोणपाटाची वस्त्रे घालून दंडवत घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 21:16
15 Iomraidhean Croise  

देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.


एलीयाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडली व अंगास गोणपाट गुंडाळून उपवास केला; तो गोणपाटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला.


हे ऐकून हिज्कीयाने आपली वस्त्रे फाडली व गोणपाट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.


अलीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.” परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले.


मी बाबेलच्या राजाचे भुज बळकट करीन आणि फारोचे भुज गळतील; मी मिसर देशावर उगारण्यासाठी बाबेलच्या राजाच्या हाती तलवार देईन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.


त्यांनी अशी कत्तल चालवली असता मी सुटलो, तेव्हा मी उपडा पडून ओरडून म्हणालो, “हायहाय! प्रभू परमेश्वरा, तू यरुशलेमेवर आपल्या क्रोधाचा वर्षाव करून अवघ्या अवशिष्ट इस्राएलांचा विध्वंस करशील काय?”


तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले,


तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, “हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय?”


परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा असल्याचे त्या गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाट सोडून शेतात शिरली; तिला पुन्हा वाटेवर आणण्यासाठी बलामाने तिला मारले.


तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामाने नमन करून लोटांगण घातले.


तेव्हा वेदीवरून स्वर्गाकडे ज्वाला उसळली आणि परमेश्वराच्या दूताने त्या वेदीवरल्या ज्वालेतून आरोहण केले. ते पाहून मानोहा व त्याची बायको ह्यांनी लोटांगण घातले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan