१ इतिहास 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अबीगईलीस अमासा झाला. अमासाचा बाप येथेर इश्माएली हा होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अमासाची आई अबीगईल अमासाचे पिता येथेर हे इश्माएली होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अबीगईलला अमासा झाला, अमासाचा पिता इश्माएली येथेर होता. Faic an caibideil |
सरूवेचा पुत्र यवाब ह्याने माझ्याशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे; नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा हे जे इस्राएलाचे दोन सेनापती त्यांचे त्याने काय केले ते तुला ठाऊकच आहे; त्या दोघांचा त्याने घात केला. शांततेच्या समयी युद्धप्रसंगासारखा रक्तपात केला; त्यात त्याने आपला कमरबंद व आपली पायतणे भिजवली.
मग त्या तिसांतला प्रमुख जो अमासय ह्याला आत्म्याने व्यापले व तो म्हणाला, “हे दाविदा, आम्ही आपलेच आहोत; इशायपुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहोत; आपले कुशल असो, कुशल असो; आपल्या साहाय्यकर्त्यांचेही कुशल असो; कारण आपला देव आपला साहाय्यकारी आहे.” ह्यावर दाविदाने त्यांना ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमले.