Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 19:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा अम्मोनी लोकांनी बाहेर पडून वेशीनजीक व्यूह रचला; जे राजे आले होते ते मैदानात एकीकडे उभे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 अम्मोनी लोक बाहेर पडले व लढाईसाठी त्यांनी नगराच्या वेशीजवळ मांडणी केली. आलेले राजे मैदानात एकीकडे उभे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तेव्हा अम्मोन्यांचे सैन्य बाहेर आले आणि युद्धाच्या तयारीने त्यांच्या नगराच्या दरवाजाजवळ येऊन थांबले, युद्ध करण्यासाठी आलेले राजे एकीकडे मोकळ्या प्रदेशात एकटेच होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 19:9
12 Iomraidhean Croise  

तेव्हा अम्मोनी लोकांनी बाहेर पडून वेशीनजीक युद्धासाठी व्यूह रचला; इकडे सोबा व रहोब येथले अरामी आणि तोब व माका ह्यांचे शिपाई निराळ्या ठिकाणी मैदानात होते.


राजा त्यांना म्हणाला, “तुम्हांला योग्य वाटते तसे मी करतो.” मग राजा वेशीच्या बाजूस उभा राहिला, आणि लोक शंभरशंभर, हजारहजार असे बाहेर निघाले.


अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने आपली सारी सेना एकवट केली; त्याच्याबरोबर बत्तीस राजे, घोडे व रथ होते; त्यांसह तो गेला; आणि शोमरोनास वेढा घालून त्याच्याशी लढला.


आता एवढे मात्र करा, राजांना काढून टाका, प्रत्येकाला त्याच्या जागेवरून दूर करा; आणि त्यांच्या जागी सुभेदार नेमा;


आपल्या मागे व पुढे व्यूह रचला आहे हे यवाबाने पाहून इस्राएल लढवय्यांतील निवडक शिपाई घेऊन त्यांना अराम्यांसमोर उभे केले;


हे ऐकून दाविदाने यवाबाला योद्ध्यांच्या सर्व सैन्यासह पाठवले.


अबीया मोठमोठ्या लढवय्यांचे चार लक्ष सैन्य घेऊन लढाईस उभा राहिला; इकडे यराबाम मोठे शूर वीर असे निवडक आठ लक्ष पुरुष घेऊन त्याच्याशी सामना करायला व्यूह रचून सिद्ध झाला.


आसा त्याच्याशी सामना करण्यास गेला तेव्हा मारेशा येथे सफाथा नावाच्या खोर्‍यात लढाईस तोंड लागले.


न्यायासनावर बसणार्‍याला न्यायस्फूर्ती, वेशीवर हल्ला करणार्‍या शत्रूला हटवणार्‍यांना वीरश्री असा तो होईल.


ते धनुष्य व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही; ते सागराप्रमाणे गर्जना करतात, ते घोड्यांवर स्वार झाले आहेत. हे बाबेलकन्ये, ते युद्धास सिद्ध झाल्याप्रमाणे तुझ्यावर येत आहेत.


ते उड्या टाकतात, त्यांचा आवाज डोंगरमाथ्यांवरून जाणार्‍या रथांच्या आवाजासारखा आहे; धसकट खाऊन टाकणार्‍या ज्वालेच्या कडकडण्यासारखा ते आवाज करतात; युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहेत.


इकडे शौलाने आणि इस्राएल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोर्‍यात तळ दिला, आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यास सैन्यरचना केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan