Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 19:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा हानून व अम्मोनी लोक ह्यांनी मेसोपटेम्या, अराम-माका व सोबा येथून रथ व घोडेस्वार आणण्यासाठी एक हजार किक्कार1 रुपे पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जेव्हा अम्मोन्यांनी पाहिले की, दावीदाला आम्ही दुर्गंध असे झाले आहोत, तेव्हा हानून आणि अम्मोनी लोकांनी मेसोपटेम्या व अराम माका व सोबा येथून रथ आणि सारथी मोलाने आणण्यासाठी एक हजार किक्कार रुपे पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा हानून व अम्मोन्यांनी अराम-नहराईम, अराम-माकाह व सोबाह येथून एक हजार तालांत चांदी देऊन सैन्य, रथ व घोडदळ ही भाड्याने आणली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 19:6
21 Iomraidhean Croise  

तेव्हा शिमोन व लेवी ह्यांना याकोब म्हणाला, “ह्या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी ह्यांना माझा वीट येईल असे करून तुम्ही मला संकटात घातले आहे; माझे लोक मूठभर आहेत, म्हणून ते एकजूट करून माझ्यावर येतील व माझी कत्तल करतील, आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवतील.”


दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी बेथ-रहोब येथले अरामी व सोबा येथले अरामी मिळून वीस हजार पायदळ, माका राजाचे एक हजार शिपाई व तोबाचे बारा हजार शिपाई मोल देऊन बोलावले.


सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर हा महानदाजवळ आपली सत्ता पुन्हा स्थापित करू पाहत होता त्याचा दाविदाने मोड केला.


दिमिष्क येथील अरामी लोक सोबाचा राजा हदरेजर ह्याला कुमक करण्यासाठी आले तेव्हा दाविदाने त्यांतल्या बावीस हजार लोकांचा संहार केला.


दाविदाने हदरेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोवू ह्याच्या कानावर गेले;


त्या लोकांना कशी वागणूक मिळाली हे कोणी जाऊन दाविदाला सांगितले. हे वर्तमान ऐकून दाविदाने त्यांची वाटेत गाठ घेण्यास माणसे पाठवली; कारण त्यांना मोठी लाज वाटत होती. राजाने त्यांना सांगून पाठवले की, “तुमची दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे राहा, मग इकडे या.”


यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला इस्राएलाचा राजा अहाब म्हणाला, “रामोथ-गिलाद येथे लढायला आपण माझ्याबरोबर याल काय?” त्याला यहोशाफाटाने उत्तर दिले, “मी आणि आपण एकच; माझे लोक ते आपले लोक; आम्ही आपल्याबरोबर लढाईस येऊ.”


इस्राएलाच्या राजाने सुमारे चारशे संदेष्टे जमवून त्यांना विचारले, “आम्ही रामोथ-गिलादावर चढाई करून जावे की न जावे?” त्यांनी उत्तर दिले, “चढाई करून जावे; देव ते राजाच्या हाती देईल.”


इस्राएलाचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शोमरोनाच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते, आणि सर्व संदेष्टे त्यांच्यापुढे भाषण करीत होते.


त्याप्रमाणेच त्याने शंभर किक्कार चांदी देऊन एक लाख इस्राएल योद्धे चाकरीस ठेवले.


त्याने अम्मोनी लोकांच्या राजाशी लढून त्यांच्यावर वर्चस्व मिळवले त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर किक्कार चांदी, दहा हजार कोर गहू, दहा हजार कोर जव अशी खंडणी दिली. दुसर्‍या व तिसर्‍या वर्षीही अम्मोनी लोकांनी अशीच खंडणी दिली.


ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकूणएक बिघडला आहे, सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.


तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो.


तेव्हा ते त्यांना म्हणाले, “परमेश्वर तुम्हांला पाहून घेवो; फारोच्या दृष्टीने व त्याच्या चाकरांच्याही दृष्टीने तुम्ही आम्हांला आमची किळस येईल असे केले आहे; आम्हांला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तलवारच दिली आहे.”


जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो; जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो; आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.”


म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.


शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर मारा केला आणि पलिष्टी लोकांना इस्राएलाचा वीट आला, हे सर्व इस्राएलाच्या कानी गेले. हे ऐकून लोक शौलाजवळ गिलगालात जमा झाले.


इस्राएलावर राज्य स्थापित केल्यावर शौलाने मवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राजे व पलिष्टी ह्यांच्याशी युद्ध केले. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे तो विजयी होई.


आखीशाने दाविदाच्या बोलण्यावर भरवसा ठेवून म्हटले, “ह्याने इस्राएल लोकांना आपला अगदी वीट येईलसे केले आहे; तर आता हा निरंतर आपला दास होऊन राहील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan