१ इतिहास 19:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
3 त्या वेळी अम्मोनी लोकांचे सरदार हानूनास म्हणाले की, “दाविदाने तुझे समाधान करायला लोक पाठवले आहेत ते तुझ्या बापाविषयी आदरबुद्धी दर्शवण्यासाठी पाठवले आहेत असे तुला वाटते काय? ह्या देशाची पाहणी-टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून त्याचे चाकर तुझ्याकडे आले आहेत, नाही काय?”
3 तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हानूनाला म्हणाले की, “दावीदाने तुझे सांत्वन करण्याकरता किंवा तुझ्या मृत पित्याचा मान केला असे तुला वाटते का? त्याने या लोकांस तुझा प्रदेश पाहण्यास आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्यास तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे.”
3 तेव्हा अम्मोनी अधिकार्यांनी हानूनला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे राजदूत पाठवून तुमच्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ देशाची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?”
त्या वेळी अम्मोनी लोकांचे सरदार आपला स्वामी हानून ह्याला म्हणाले की, “दाविदाने आपले सांत्वन करण्यासाठी लोक पाठवले आहेत ते आपल्या बापाविषयीची आदरबुद्धी दर्शवण्याकरता पाठवले आहेत असे आपल्याला वाटते काय? ह्या नगराची पाहणी व टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून दाविदाने आपले चाकर पाठवले आहेत; नाही काय?”
तेव्हा दाविदाने मनात आणले की, “हानूनाचा बाप नाहाश ह्याने आपल्यावर दया केली तशीच आपण त्याच्या पुत्रावर करावी,” म्हणून दाविदाने त्याच्या बापाच्या मृत्यूबद्दल त्याचे समाधान करण्यासाठी जासूद पाठवले. हानूनाचे समाधान करायला दाविदाचे सेवक अम्मोनी लोकांच्या देशात आले,
तेव्हा दानवंशजांनी आपल्या कुळातल्या लोकांतून पाच शूर वीर निवडले आणि त्यांना सरा व एष्टावोल येथून देश हेरून पाहण्यास पाठवले; त्यांना ते त्या प्रांताची पाहणी करा असे म्हणाले; ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आले व तेथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला.
पण पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; ते त्याला म्हणाले, “जे स्थळ तू त्याला दिले आहेस तेथे त्याला परत पाठवून दे; त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर तो आमचा वैरी होईल; तो आपल्या स्वामीला दुसर्या कशाने प्रसन्न करणार बरे? ह्या लोकांची शिरे कापूनच की नाही?
आखीश दाविदाला म्हणाला, “मला ठाऊक आहे की तू माझ्या दृष्टीने देवदूतासारखा चांगला आहेस; तरी पलिष्ट्यांचे सरदार म्हणतात की तू त्यांच्याबरोबर लढाईला जाऊ नयेस.