Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 19:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढण्याची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 बलवान हो, व आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण सामर्थ्य दाखवू, मग परमेश्वराचे जे काय चांगले उद्देश आहेत तसे तो करो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 19:13
18 Iomraidhean Croise  

हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढाईची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.”


पण मी तुझ्यावर आता प्रसन्न नाही असे तो म्हणाल्यास, पाहा, मी येथे हजर आहे, त्याच्या मर्जीस वाटेल तसे त्याने माझे करावे.”


तो म्हणाला, “अरामी माझ्याहून प्रबळ होऊ लागले तर तू मला साहाय्य कर आणि अम्मोनी लोक तुझ्याहून प्रबल झाले तर मी तुला साहाय्य करीन.


पुढे यवाब व त्याच्याबरोबरचे लोक अराम्यांशी युद्ध करण्यास चालून गेले तेव्हा ते त्याच्यापुढून पळून गेले.


तर आता ऊठ, हे काम तुझे आहे; आम्ही तुझ्याबरोबर आहोत; हिंमत धरून हे कर.”


ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.”


ह्या सर्व प्रसंगांत ईयोबाच्या हातून पाप झाले नाही; व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.


परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.


सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा; खंबीर व्हा.


मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील.


यहोशवा त्यांना म्हणाला, “भिऊ नका, कचरू नका, खंबीर व्हा, हिंमत धरा; कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूंचे परमेश्वर असेच करील.”


तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराला म्हणाले, “आम्ही पाप केले आहे; तुला बरे दिसेल तसे कर, मात्र आज आमचा बचाव कर, एवढीच आमची विनवणी आहे.”


मग दावीद शौलाला म्हणाला, “त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये; आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल.”


शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काही लपवले नाही. मग तो म्हणाला, “परमेश्वरच तो, त्याला जसे बरे वाटेल तसे तो करो.”


तर अहो पलिष्ट्यांनो, हिंमत धरा, मर्दांप्रमाणे वागा; इब्री तुमचे दास होऊन राहिले आहेत तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नका; तर मर्दाप्रमाणे वर्ता, युद्ध करा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan