Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 18:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली आणि सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्याला यश दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 अदोमामध्ये अबीशयने मजबूत बस्थान बसविले आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 18:13
19 Iomraidhean Croise  

परमेश्वर तिला म्हणाला, “तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत; तुझ्या उदरातून दोन वंश निघतील; एक वंश दुसर्‍या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकट्याची सेवा करील.”


लोक तुझी सेवा करोत; वंश तुला नमोत; तू आपल्या भाऊबंदांचा स्वामी हो; तुझे सहोदर तुला नमोत; तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होवोत; तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत.


तेव्हा इसहाकाने उत्तर दिले, “पाहा, मी त्याला तुझा स्वामी करून ठेवले आहे, त्याचे सर्व भाऊबंद त्याचे सेवक केले आहेत आणि धान्य व द्राक्षारस ह्यांच्या योगे त्याला मी समृद्ध केले आहे; तर माझ्या मुला, आता तुझ्यासाठी मी काय करू?”


तू आपल्या तलवारीने जगशील, व आपल्या भावाचे दास्य करशील. तरी असे घडून येईल की तू अनावर होशील, तेव्हा तू आपल्या मानेवरचे त्याचे जू उडवून देशील.”


त्या वेळी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते.


दावीद अदोमात होता आणि यवाब सेनापती मृतांना मूठमाती देण्यासाठी तेथे गेला असताना त्याने अदोमातील एकूणएक पुरुषास मारून टाकले.


सरूवेचा पुत्र अबीशय ह्याने क्षार खोर्‍यात अठरा हजार अदोम्यांना मार दिला.


दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व नीतीने वागे.


मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-तिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई.


परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जिवाचे रक्षण करील.


तूच राजांना तारण देणारा आहेस; तूच आपला सेवक दावीद ह्याला दुष्टांच्या तलवारीपासून मुक्त करणारा आहेस.


त्याचे शत्रू अदोम व सेईर हे त्याच्या ताब्यात येतील तोवर इस्राएल आपला प्रभाव दाखवील.


दिमिष्कात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकार्‍याने मला धरण्याकरता दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा ठेवला होता.


मग तू देवाच्या टेकडीजवळ पोहचशील, तेथे पलिष्ट्यांचा चौकीपहारा आहे; तू तेथे नगराजवळ पोहचल्यावर संदेष्ट्यांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल, त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजत असतील; व ते भाषण करीत असतील.


गिबा येथे पलिष्ट्यांचे ठाणे होते त्यावर योनाथानाने मारा केला; हे वर्तमान पलिष्ट्यांच्या कानी गेले. मग शौलाने देशभर रणशिंग वाजवून लोकांना सांगितले की, “इब्री लोकहो, कान द्या.”


एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, “चल, आपण पलीकडे पलिष्ट्यांचे ठाणे आहे तेथे जाऊ.” पण त्याने हे बापाला कळवले नाही.


दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे, आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan