Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 18:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 सरूवेचा पुत्र अबीशय ह्याने क्षार खोर्‍यात अठरा हजार अदोम्यांना मार दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 सरुवेचा पुत्र अबीशय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांस मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जेरुइयाहचा पुत्र अबीशाईने क्षार खोर्‍यात एदोमाचे अठरा हजार लोक ठार मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 18:12
23 Iomraidhean Croise  

वरकड लोक त्याने आपला भाऊ अबीशय ह्याच्या हाती दिले, व त्याने अम्मोन्यांसमोर त्यांची व्यूहरचना केली.


अरामी पळून गेले हे पाहून अम्मोनी लोकही अबीशय ह्याच्यापुढून पळून जाऊन नगरात शिरले. तेव्हा यवाब अम्मोन्यांशी लढण्याचे सोडून यरुशलेमेस परत आला.


तेव्हा दावीद अबीशय ह्याला म्हणाला, “आता बिक्रीचा पुत्र शबा हा अबशालोमापेक्षाही आमचे अधिक वाईट करणार; तर तू आपल्या स्वामीचे लोक बरोबर घेऊन त्याचा पाठलाग कर, नाहीतर तो तटबंदी नगराचा आश्रय करून आमच्या दृष्टिआड लपून राहील.”


पण सरूवेचा पुत्र अबीशय ह्याने दाविदाचा बचाव केला; त्या पलिष्ट्याला त्याने ठार मारले. मग दाविदाच्या लोकांनी त्याला शपथ घालून सांगितले, “पुन्हा आपण आमच्याबरोबर लढाईला येऊ नका; इस्राएलाचा दीप आपण मालवू नये.”


सरूवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अबीशय हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले व त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.


यवाब व त्याचा भाऊ अबीशय ह्यांनी अबनेराचा वध केला; कारण त्याने त्यांचा भाऊ असाएल ह्याला गिबोनाच्या लढाईत मारले होते.


तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन.


दावीद अदोमात होता आणि यवाब सेनापती मृतांना मूठमाती देण्यासाठी तेथे गेला असताना त्याने अदोमातील एकूणएक पुरुषास मारून टाकले.


त्याने क्षार खोर्‍यात अदोमाच्या दहा हजार लोकांना मारून टाकले; सेला नगर लढून घेतले व त्याचे नाव बदलून ते यकथेल असे ठेवले; आजवर ते नाव चालू आहे.


यवाबाचा भाऊ अबीशय हा त्या तिघांचा प्रमुख होता; त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले; त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.


सर्व जिंकलेल्या राष्ट्रांतून आणलेल्या सोन्याचांदीबरोबर हीही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला समर्पण केली. अदोमी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी व अमालेकी ह्या सर्वांपासून ही लूट आणली होती.


त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली आणि सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्याला यश दिले.


आणि वरकड लोक त्याने आपला भाऊ अबीशय ह्याच्या हाती दिले, व त्यांनी अम्मोन्यांसमोर आपली व्यूहरचना केली.


व त्यांच्या बहिणी सरूवा व अबीगईल ह्या होत. सरूवेचे अबीशय, यवाब व असाएल असे तिघे पुत्र होते.


अमस्याने हिंमत धरून आपल्या लोकांना युद्धास नेले; क्षारखोर्‍यात जाऊन सेईर वंशजांपैकी दहा हजार लोक त्याने वधले.


हे देवा, तू आमचा त्याग केला आहेस, आमची दाणादाण केली आहेस; तू कोपायमान झाला आहेस; तू आम्हांला पूर्वस्थितीवर आण.


तू भूमी कंपित केली आहेस, ती विदारली आहे; तिची भगदाडे भरून काढ, कारण ती डळमळत आहे.


तेव्हा दाविदाने अहीमलेख हित्ती आणि यवाबाचा भाऊ सरूवेचा पुत्र अबीशय ह्यांना म्हटले, “माझ्याबरोबर त्या छावणीत शौलाकडे येण्यास कोण तयार आहे?” अबीशय म्हणाला, “मी आपल्याबरोबर येतो.”


तेव्हा अबीशय दाविदाला म्हणाला, “देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे; तर आता मला त्याच्या भाल्याने त्याच्यावर असा एकच वार करू द्या की तो त्याला भेदून जमिनीत शिरेल; भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan