Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 17:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मी आपल्या इस्राएलासाठी एक स्थान नेमून देईन, मी तेथे त्यांना रोवीन; म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व तेथून पुढे कधी ढळणार नाहीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 माझ्या इस्राएल लोकांस मी एक जागा नेमून देईन आणि त्यांना त्याठिकाणी स्थिर करीन, म्हणजे ते आपल्या स्वतःच्या जागी राहतील व त्यांना कसलाही त्रास होणार नाही. पूर्वीसारखे दुष्ट लोक त्यांच्यावर जुलूम करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना आपले स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 17:9
21 Iomraidhean Croise  

इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्यांच्या काळापासून दुर्जन जसे त्यांना त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत; मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड केला आहे. मी तुला म्हणत आहे की, परमेश्वर तुझे घराणे कायमचे स्थापील.


जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे थोर पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे मी तुझे नाव करीन.


तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे ह्यांना स्थापले; त्या लोकांना क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला.


शत्रू त्याला छळणार नाहीत; दुष्ट जन त्याला पीडा देणार नाहीत.


जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील.


बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यू पावला; इकडे इस्राएलवंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहचली.


तुझी मुले त्वरेने येत आहेत; तुझा नाश करणारे तुला उजाड करणारे तुझ्यातून निघून जात आहेत.


ह्यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश ह्यांचे नावही ऐकू येणार नाही; तारण माझा कोट व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील.


सीयोनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे; खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे; ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आहे.


मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही.


मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.


तू आपल्या अकलेने व चातुर्याने धन संपादन केलेस व आपल्या भांडारांत सोन्यारुप्याचा संचय केलास;


मी त्यांना राष्ट्रांतून आणीन, निरनिराळ्या देशांतून त्यांना जमा करीन; मी त्यांना स्वदेशी परत आणीन; मी इस्राएलाच्या पर्वतांवर, नाल्यांजवळ व देशातल्या सर्व वसतिस्थानांत त्यांना चारीन.


जो देश माझा सेवक याकोब ह्याला मी दिला व ज्यात तुमचे पूर्वज राहत असत त्यात ते वस्ती करतील; तेथे ते व त्यांचे पुत्रपौत्र सर्वकाळ वस्ती करतील; माझा सेवक दावीद त्यांच्यावर सर्वकाळचा अधिपती होईल.


मी त्यांना त्यांच्या भूमीत रुजवीन व जी भूमी मी त्यांना दिली आहे तिच्यातून त्यांना ह्यापुढे उपटून टाकण्यात येणार नाही,” असे परमेश्वर तुझा देव म्हणतो.


पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणार्‍या लोकांवर देवाचा कोप होतो.


‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan