Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 17:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे थोर पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे मी तुझे नाव करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आणि जेथे कोठे तू गेलास त्याठिकाणी मी तुझ्याबरोबर होतो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून कापून टाकले. आणि पृथ्वीवर जे कोणी महान लोक आहेत त्यांच्या नावासारखे मी तुझे नाव करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी, पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 17:8
24 Iomraidhean Croise  

पाहा, मी तुझ्याबरोबर आहे; जिकडे-जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन; आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही.”


परमेश्वराने दाविदाला त्याच्या सर्व शत्रूंपासून व शौलाच्या हातांतून सोडवले त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गाईले.


जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावांप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन.


मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-जिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई.


हददेजर ह्याची बेटा व बेरोथा ही नगरे होती, तेथून दावीद राजाने पुष्कळ पितळ आणले.


दाविदाची कीर्ती देशोदेशी पसरली; परमेश्वराने सर्व राष्ट्रांवर त्याचा धाक बसवला.


हे देवा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्‍याच काळाचे सांगून ठेवले आहेस; हे परमेश्वरा देवा, उच्च पदावरल्या मनुष्याप्रमाणे तू मला लेखत आहेस.


नाथान दाविदाला म्हणाला, “तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे.”


तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्या प्रजेचा, इस्राएलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून, मेंढरांमागे चालत असताना आणले,


मी आपल्या इस्राएलासाठी एक स्थान नेमून देईन, मी तेथे त्यांना रोवीन; म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व तेथून पुढे कधी ढळणार नाहीत;


ह्या यरुशलेमेत पराक्रमी राजे होऊन गेले; त्यांनी महानदाच्या पश्‍चिमेकडल्या सगळ्या देशांवर राज्य केले; लोक त्यांना खंडणी, कर व जकात देत असत.


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.


सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)


सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)


तू माझे महत्त्व वाढव आणि माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर.


तर न्याय करणारा देव आहे; तो एकाला खाली पाडतो व दुसर्‍याला वर चढवतो.


‘त्याने अधिपतींना’ राजासनांवरून ‘ओढून काढले आहे’ व ‘दीनांस उंच केले आहे.’


दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे, आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असे.


हे पाहून शौलाच्या लक्षात आले की परमेश्वर दाविदाच्या बरोबर आहे; आणि त्याची कन्या मीखल हिचे त्याच्यावर प्रेम जडले.


दावीद आणखी म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वरच त्याला मारील अथवा त्याचा काळ आला म्हणजे तो मरेल अथवा युद्धात त्याचा अंत होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan