Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 17:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी त्यांचा उद्धार करायला देव स्वतः गेला, ह्यासाठी की जी तुझी प्रजा तू मिसर देशातून सोडवलीस तिच्यादेखत मोठी व भयानक कृत्ये करून व इतर राष्ट्रांना घालवून देऊन तू आपले नाव करावेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आणि तुझ्या इस्राएल लोकांसारखे दुसरे कोठले राष्ट्र पृथ्वीवर आहे ज्यांना तू, आपलेच लोक व्हावेत, म्हणून देव स्वतः त्यांना मिसरातून सोडवण्यास गेला; या तुझ्या लोकांस तू मिसरातून सोडवले तिच्या देखत महान व भयानक कृत्ये करून तू आपले नाव केले. ज्यांना तू मिसरातून सोडवले होते, त्या तुझ्या लोकांपुढून इतर राष्ट्रांस घालवून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहे; पृथ्वीवरील असे एक राष्ट्र, ज्यांच्या परमेश्वरांनी बाहेर जाऊन स्वतःसाठी व तुमच्या नावासाठी इजिप्तमधून त्यांना खंडून घेतले, म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले?

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 17:21
29 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्या सर्वांवरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही.


तू आपले लोक इस्राएल ह्यांना तुझी निरंतरची प्रजा केले आहेस; हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास.


फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशाचे सर्व लोक ह्यांना चिन्हे व अद्भुत कृत्ये तू दाखवलीस; कारण ते त्यांच्याशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते; तू आपल्या नामाचा महिमा प्रकट केला; तो आजवर आहे.


परमेश्वराने उद्धरलेले जन असे म्हणोत कारण त्यांना त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे,


त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिले आहे; त्याने आपला करार सर्वकाळचा नेमला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे.


कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही; त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेशाचे स्तवन करा!1


हे आमच्या तारणार्‍या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस; तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हांला उत्तर देतोस.


याकोब व योसेफ ह्यांची संतती म्हणजे तुझे लोक, ह्यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहेस. (सेला)


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला; तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रीत्यर्थ मी स्वतःला आवरले.


ज्याने आपला प्रतापी भुज मोशेच्या उजव्या बाजूने चालवला, आपले नाम सर्वकाळ राहावे म्हणून ज्याने त्यांच्यापुढे समुद्र दुभागला,


त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणार्‍या दिव्यदूताने त्यांचे तारण केले; त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धरले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले.


तू अनपेक्षित भयप्रद कृत्ये करीत असता तुझ्या दर्शनाने राष्ट्रे थरथर कापली असती तर बरे होते!


तू चिन्हे व अद्भुत कृत्ये दाखवून समर्थ हाताने व बाहू उभारून मोठी दहशत घालून आपले लोक इस्राएल ह्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस;


तूही मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मुक्त केले ह्याचे स्मरण ठेव; म्हणून ही आज्ञा मी आज तुला देत आहे.


कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?


त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’


हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलातर्फे लढला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan