Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 17:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुझे दिवस पुरे झाले व तू जाऊन आपल्या पितरांजवळ निजलास म्हणजे तुझ्या पुत्रांपासून निर्माण होणार्‍या संतानाला तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि असे होईल की जेव्हा तुझे दिवस परिपूर्ण होऊन तू आपल्या पूर्वजाकडे गेल्यावर, मी तुझ्यानंतर तुझ्या वंशातून जो तुझा पुत्र, त्यास मी उभे करीन, मी त्याचे राज्य स्थापीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील, तेव्हा मी तुझे संतान, तुझ्या पुत्रांपैकी एक उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य स्थापित करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 17:11
21 Iomraidhean Croise  

तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील; चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठमाती देतील.


नाहीतर जेव्हा आमचे स्वामीराजे आपल्या पितरांजवळ जाऊन निजतील तेव्हा मी व माझा पुत्र शलमोन ह्यांना गुन्हेगार गणतील.”


नंतर दावीद आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्याला दावीदपुरात मूठमाती दिली.


पण तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील.


परमेश्वर जे हे वचन बोलला ते त्याने पुरे केले; मी आपला बाप दावीद ह्याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्राएलाच्या गादीवर बसलो आहे; आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ मी हे मंदिर बांधले आहे.


इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्यांच्या काळापासून दुर्जन जसे त्यांना त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत; मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड केला आहे. मी तुला म्हणत आहे की, परमेश्वर तुझे घराणे कायमचे स्थापील.


तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर बांधील व मी त्याचे राजासन निरंतरचे स्थापीन.


परमेश्वराने मला बहुत पुत्र दिले आहेत, त्या सर्वांतून इस्राएलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराच्या राजासनावर बसावे म्हणून त्याने माझा पुत्र शलमोन ह्याला निवडले आहे.


आम्ही आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यासमोर उपरे व परदेशी आहोत; ह्या भूतलावरील आमचे दिवस छायेप्रमाणे असतात; आमची काही शाश्वती नाही.


आयुष्य, धन व मान ह्यांनी संपन्न होऊन आणि चांगला वृद्ध होऊन तो मृत्यू पावला; त्याचा पुत्र शलमोन त्याच्याजागी राजा झाला.


पण तू ते मंदिर बांधणार नाहीस तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील.’


परमेश्वराने दाविदाजवळ खरी शपथ वाहिली आहे; तो माघार घेणार नाही; ती शपथ अशी की, “मी तुझ्या पोटच्या फळांतले तुझ्या राजासनावर बसवीन;


हे परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृतींची स्तुती आकाश करील; तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळीत होईल.


कारण परमेश्वर म्हणतो, इस्राएलाच्या घराण्याच्या सिंहासनावर बसणार्‍यांची उणीव दाविदाला पडणार नाही;


कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला, आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला;


बंधुजनहो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुमच्याबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे.


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, तू लवकरच आपल्या पूर्वजांबरोबर कालनिद्रा घेणार आहेस; मग हे लोक ज्या देशात जाणार आहेत त्यातल्या लोकांमध्ये आल्यावर अन्य देवांच्या मागे व्यभिचारी मतीने लागण्यास प्रवृत्त होतील, व माझा त्याग करून मी त्यांच्याशी केलेला करार मोडतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan