Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 16:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्या दिवशी प्रथम दाविदाने परमेश्वराचे स्तोत्र म्हणण्याचे काम आसाफ व त्याचे बांधव ह्यांना सांगितले; ते स्तोत्र हे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा त्यादिवशी पहिल्याने दावीदाने आसाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्या दिवसापासून दावीदाने याहवेहची अशा प्रकारे उपकारस्तुती करण्यासाठी आसाफ व त्याचे सहायक नेमले:

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 16:7
7 Iomraidhean Croise  

परमेश्वराने दाविदाला त्याच्या सर्व शत्रूंपासून व शौलाच्या हातांतून सोडवले त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गाईले.


आणि बनाया व याहजिएल हे याजक देवाच्या कराराच्या कोशापुढे नित्य कर्णे वाजवत असत.


मग हिज्कीया राजा व सरदार ह्यांनी लेव्यांना आज्ञा केली की दावीद व आसाफ द्रष्टा ह्यांची कवने गाऊन परमेश्वराची स्तुती करा. तेव्हा त्यांनी आनंदाने स्तुती केली व आपली मस्तके लववून आराधना केली.


आणि लेव्यांतले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमीएलाचा पुत्र येशूवा व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे गटागटाने देवाचा मनुष्य दावीद ह्याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व ईशोपकारस्मरण करायला होते.


हे परमेश्वरा, साहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही; मानवजातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत.


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan