Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 16:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 त्यांच्याबरोबर हेमान व यदूथून कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून देवाप्रीत्यर्थ गायनवादन करीत; यदूथूनाच्या पुत्रांना द्वारपाळ केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे व देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदूथूनाचे पुत्र द्वाररक्षक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 त्यांच्याबरोबर हेमान आणि यदूथून यांना कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करण्याची जबाबदारी दिली. यदूथूनच्या पुत्रांची द्वारपाल म्हणून नेमणूक करण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 16:42
8 Iomraidhean Croise  

तेव्हा लेव्यांनी हेमान बिन योएल आणि त्याच्या भाऊबंदांपैकी आसाफ बिन बरेख्या व त्यांचे बांधव मरारीवंशज ह्यांच्यातला एथान बिन कुशाया ह्यांना नेमले;


यदूथूनाचे वंशज : यदूथूनाचे पुत्र गदल्या, सरी, यशाया, हशब्या व मत्तिथ्या असे सहा;1 त्यांचा बाप यदूथून वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण व स्तवन करून संदेश देत असे, ते त्याच्या हाताखाली असत.


कर्णे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे, झांजा आदिकरून वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्चस्वरे करू लागले; ती अशी : “तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे.” तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.


याजक आपापल्या स्थानी उभे राहिले; परमेश्वराची दया सनातन आहे असे लेव्यांच्या द्वारे परमेश्वराचे उपकारस्मरण करण्यासाठी जी वाद्ये दावीद राजाने परमेश्वराप्रीत्यर्थ केली होती ती घेऊन लेवीही उभे राहिले; त्यांच्यापुढे याजक कर्णे वाजवू लागले आणि सर्व इस्राएल लोक उभे राहिले.


खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan