Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 16:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 “परमेश्वराची दया सनातन आहे” म्हणून त्याचा धन्यवाद करण्यासाठी त्याच्याबरोबर हेमान व यदूथून व इतर नावे घेऊन निवडलेले लोक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 आणि त्यांच्याबरोबर हेमान, यदूथून व बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांनी परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 त्यांच्यासोबत हेमान, यदूथून आणि नावे घेऊन निवडलेल्या इतर अनेकांची नेमणूक केली. या सर्वांना “याहवेहची प्रीती सनातन आहे” अशी त्यांची उपकारस्तुती करण्यासाठी नेमण्यात आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 16:41
21 Iomraidhean Croise  

मनश्शेच्या अर्ध्या वंशातले अठरा हजार लोक दाविदाला राजा करण्यास आले; त्यांची नावे नोंदण्यात आली.


तेव्हा लेव्यांनी हेमान बिन योएल आणि त्याच्या भाऊबंदांपैकी आसाफ बिन बरेख्या व त्यांचे बांधव मरारीवंशज ह्यांच्यातला एथान बिन कुशाया ह्यांना नेमले;


परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.


कोशापुढे दररोज गरज पडेल त्याप्रमाणे सतत सेवा करावी म्हणून दाविदाने आसाफ व त्याचे भाऊबंद ह्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर राहण्यासाठी नेमले;


तेथे हजर असत ते व त्यांचे पुत्र हे : कहाथी वंशापैकी गायक हेमान, बिन योएल, बिन शमुवेल,


सैन्याबरोबर बाहेर जाताना ‘परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे,’ हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांना त्या कामी नेमले.


कर्णे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे, झांजा आदिकरून वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्चस्वरे करू लागले; ती अशी : “तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे.” तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.


अग्नी खाली आला आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर फाकले तेव्हा सर्व इस्राएल लोक ते पाहत राहिले; जमिनीवरच्या फरसबंदीपर्यंत त्यांनी आपली मुखे लववून नमन केले आणि “परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे” असे म्हणून त्यांनी त्याचे उपकारस्मरण केले.


“परमेश्वर चांगला आहे व इस्राएलावर त्याची दया सनातन आहे” असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालत आहेत हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जयजयकार केला.


याशिवाय दावीद व सरदार ह्यांनी लेव्यांच्या सेवेसाठी नेमून दिलेल्या नथीनीमांपैकी दोनशे वीस आणले; ह्या सर्वांची नावे नोंदली.


परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणार्‍यांवर युगानुयुग असते, आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो;


परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.


परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सनातन आहे.


मी म्हणालो की, “मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन; माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन.”


मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन.


त्यांत आनंद व हर्ष ह्यांचा ध्वनी होईल, नवर्‍याची व नवरीची वाणी ऐकू येईल; ‘सेनाधीश परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सर्वकाळची आहे,’ असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतात त्यांचा शब्द पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास उलटवून आरंभी होते तसे सर्वकाही करीन, असे परमेश्वर म्हणतो.


आतील द्वाराच्या बाहेर, आतील अंगणात दोन खोल्या होत्या, एक उत्तरद्वाराच्या बाजूस दक्षिणाभिमुख होती व दुसरी दक्षिणद्वाराच्या बाजूस उत्तराभिमुख होती.


ज्यांची नावे वर नमूद केली त्यांना मोशे व अहरोन ह्यांनी बरोबर घेतले,


आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan