Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याने इस्राएलाच्या प्रत्येक स्त्रीपुरुषास एकेक भाकर, एकेक मांसाचा तुकडा व खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग त्याने इस्राएलातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकएक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि खिसमिसांची एकएक ढेप वाटून दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नंतर त्याने इस्राएल लोकांच्या प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप व मनुक्यांची एक वडी वाटप केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 16:3
11 Iomraidhean Croise  

शलमोन जागा झाला तेव्हा आपल्याला स्वप्न पडले असे त्याला समजले; मग यरुशलेमेला जाऊन त्याने परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली व आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.


दाविदाने होमबली व शांत्यर्पणे ह्यांची समाप्ती केल्यावर परमेश्वराच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला.


मग दाविदाने परमेश्वराच्या कोशापुढे सेवाचाकरी करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा गुणानुवाद व उपकारस्मरण करण्यास काही लेवी नेमले;


यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने अर्पणासाठी मंडळीला एक हजार गोर्‍हे आणि सात हजार मेंढरे दिली; आणि सरदारांनी मंडळीला एक हजार गोर्‍हे व दहा हजार मेंढरे दिली; त्या वेळी पुष्कळ याजकांनी आपणांस पवित्र केले.


तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”


मनुकांची पोळी देऊन माझ्या जिवाला आराम द्या; सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या. मी प्रेमज्वराने पीडित झाले आहे;


ह्यास्तव मवाब स्वतःविषयी विलाप करील; सर्व लोक शोक करतील, कीर-हरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांविषयी1 अगदी निराश होऊन तुम्ही उसासा टाकाल.


उत्सव, चंद्रदर्शने, शब्बाथ व इस्राएल घराण्याचे सर्व सण ह्यांत होमार्पण, अन्नार्पण व पेयार्पण ह्यांची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे; इस्राएल घराण्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणून त्याने पापार्पण, अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावीत.


मग परमेश्वराने मला म्हटले, “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिच्यावर प्रेम कर.”


कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan