Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 16:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व दैवतांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 16:25
15 Iomraidhean Croise  

राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.


जे मंदिर मी बांधत आहे ते मोठे होणार, कारण आमचा देव सर्व दैवतांहून मोठा आहे.


परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे.


परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे.


तुझे, केवळ तुझेच, भय धरले पाहिजे; तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील?


तू स्वर्गातून आपला निर्णय ऐकवला; तेव्हा पृथ्वी भ्याली व स्तब्ध झाली;


पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे; त्याच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तो भीतिप्रद आहे.


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे भय धरणार नाही काय? माझ्यापुढे थरथर कापणार नाही काय? मी तर समुद्राला वाळू ही सीमा नेमली आहे; ही सर्वकाळची मर्यादा त्याच्याने उल्लंघवत नाही; त्याच्या लाटा उचंबळतात तरी त्यांचे काही चालत नाही; त्या गर्जना करतात तरी त्यांना ती उल्लंघवत नाही.


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan