Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 16:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्या वेळी तुम्ही मोजके, फार थोडे होता, व त्या देशात तुम्ही उपरे होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते निश्चितच थोडे, वचनदत्त देशात ते परके होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 16:19
5 Iomraidhean Croise  

तेव्हा शिमोन व लेवी ह्यांना याकोब म्हणाला, “ह्या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी ह्यांना माझा वीट येईल असे करून तुम्ही मला संकटात घातले आहे; माझे लोक मूठभर आहेत, म्हणून ते एकजूट करून माझ्यावर येतील व माझी कत्तल करतील, आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवतील.”


ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्‍या लोकांत हिंडले.


पण त्यात त्याला वतन ‘दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही;’ त्याला मूलबाळ नव्हते तरी हा देश ‘त्याचा व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे’ अभिवचन देवाने त्याला दिले.


परमेश्वराने तुमच्यावर प्रेम करून तुम्हांला निवडले ह्याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रांपेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे; उलट तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने कमी होता;


हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan