Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 16:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्याने केलेल्या आश्र्चर्यकारक कृत्यांची आठवण करा. त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार, आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 16:12
17 Iomraidhean Croise  

त्याचा सेवक इस्राएल ह्याचे वंशजहो, त्याने निवडलेल्या याकोबाच्या वंशजांनो, तुम्ही असे करा.


तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीवर आहेत.


हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस;


आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे; परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे.


मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो.


हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत.


तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे.


हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो.


परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत.


मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन करीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन.


त्याने मिसर देशात आपली चिन्हे, सोअनाच्या पटांगणावर आपली अद्भुत कृत्ये दाखवली, तो दिवस त्यांनी आठवला नाही.


पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे? तेव्हा त्याला सांग, ‘मिसर देशातून, दास्यगृहातून परमेश्वराने आम्हांला आपल्या भुजबलाने बाहेर आणले,


मोशे लोकांना म्हणाला, “ह्या दिवसाची आठवण ठेवा; ह्याच दिवशी तुम्ही मिसरातून, दास्यगृहातून बाहेर निघालात; परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हांला ह्या ठिकाणातून बाहेर आणले म्हणून ह्या दिवशी खमिराची भाकर खायची नाही.


अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!


नंतर मी वेदीला1 असे बोलताना ऐकले, “हो, ‘हे प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझे न्याय सत्य’ व ‘नीतीचे’ आहेत!”


कारण ‘त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे’ व ‘नीतीचे’ आहेत; ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आणि आपल्या ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan