Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 16:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांवर भरवसा ठेवा; त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परमेश्वरास व त्याच्या सामर्थ्याला शोधा. निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 16:11
11 Iomraidhean Croise  

त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा; ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो.


हे परमेश्वरा, देवा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये; हे परमेश्वरा, देवा, तुझे याजक उद्धाराने भूषित होवोत आणि तुझे भक्त सुजनतेत आनंद पावोत.


त्याला शरण जाणारे हेच लोक होत; हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. (सेला)


“आमचे कल्याण कोण करील?” असे म्हणणारे पुष्कळ आहेत; हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आमच्यावर पाड.


देवाने आमच्यावर दया करावी व आम्हांला आशीर्वाद द्यावा; त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा; (सेला)


तुझ्या पवित्रस्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे, इस्राएलाचा देव आपल्या लोकांना बल व सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.


त्याने आपल्या बलाचा पाडाव होऊ दिला, व आपले वैभव शत्रूच्या हाती पडू दिले.


शोकजनक1 खोर्‍यातून जाताना ते त्यांना झर्‍यांचे स्थानच वाटते; आगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो.


परमेश्वरास शरण जा, म्हणजे वाचाल; नाहीतर तो योसेफाच्या घराण्यावर अग्नीसारखा पडून त्याला खाऊन टाकील; त्याला विझवणारा बेथेलात कोणी असणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan