Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 15:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 परमेश्वराच्या कोशासाठी जे स्थान त्याने तयार केले होते तेथे तो न्यावा म्हणून दाविदाने सर्व इस्राएलास यरुशलेमेत एकत्र केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरूशलेमेत एकत्र जमा केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नंतर याहवेहचा कोश नव्या तंबूत आणण्याच्या समारंभासाठी दावीदाने इस्राएलाच्या सर्व लोकांना यरुशलेममध्ये एकत्र केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 15:3
13 Iomraidhean Croise  

परमेश्वराने ओबेद-अदोम ह्याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले; तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला.


लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेवला; तेव्हा दाविदाने परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.


मग शलमोन राजाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे सीयोनातून वरती आणण्यासाठी इस्राएलाचे वडील जन, वंशांचे सर्व प्रमुख व सर्व पितृकुळांचे सरदार ह्यांना शलमोन राजाकडे यरुशलेमेत जमा केले.


दावीद इस्राएलाच्या सर्व मंडळीस म्हणाला, “तुम्हांला ठीक वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर ह्याची तशी मर्जी असेल तर इस्राएलाच्या सर्व प्रदेशात जे आपले बाकीचे भाऊबंद आहेत त्यांना आणि नगरात व त्यांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जे याजक व लेवी राहत आहेत त्यांना निरोप पाठवू की, त्यांनी आपल्याला येऊन मिळावे,


तेव्हा देवाचा कोश किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून मिसरच्या शीहोर नाल्यापासून हमाथ घाटापर्यंतचे सर्व इस्राएल दाविदाने एकत्र केले.


दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकला.


“तुम्ही लेव्यांच्या पितृकुळांतील प्रमुख पुरुष आहात; तुम्ही आपल्या भाऊबंदांसह शुचिर्भूत व्हा, मग इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या कोशासाठी जे स्थळ मी तयार केले आहे तेथे तो नेऊन पोचवा.


लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेवला व त्यांनी देवापुढे होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.


शलमोनाने सर्व इस्राएलाला म्हणजे सहस्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्राएलाच्या पितृकुळांचे सर्व नायक ह्यांना सांगितल्यावरून


दाविदाने देवाच्या कोशासाठी जे स्थळ तयार केले होते तेथे किर्याथ-यारीमाहून तो आणला होता; त्याने यरुशलेमेत त्यासाठी डेरा उभारला होता.


मग शलमोनाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे अर्थात सीयोनातून वरती आणण्यासाठी इस्राएलाचे वडील जन, वंशांचे सर्व मुख्य, आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे सरदार ह्यांना यरुशलेमेत जमा केले.


त्याने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले;


मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दाराजवळ आणले आणि सर्व मंडळी जवळ येऊन परमेश्वरासमोर उभी राहिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan