Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परमेश्वराने इस्राएलावरील आपले राज्य स्थिर केले आणि आपल्या इस्राएली प्रजेप्रीत्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली हे दाविदाच्या लक्षात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला इस्राएलावर राजा केले आहे हे दावीदाला समजले आणि इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने त्याचे राज्य उंचावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि दावीदाने जाणले की याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य खूप उंचावले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 14:2
14 Iomraidhean Croise  

तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ्यापुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.”


तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले,


ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्राएलाच्या गादीवर स्थापले आहे तो आपला देव परमेश्वर धन्य होय; परमेश्वर इस्राएलांवर सर्वदा प्रेम करतो म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”


सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; आणखी त्याने गंधसरूचे लाकूड, गवंडी व सुतार दाविदासाठी मंदिर बांधायला पाठवले.


दाविदाने यरुशलेम येथे आणखी बायका केल्या, आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.


हे देवा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्‍याच काळाचे सांगून ठेवले आहेस; हे परमेश्वरा देवा, उच्च पदावरल्या मनुष्याप्रमाणे तू मला लेखत आहेस.


आपले जे सेवक लाकडे कापतील त्यांना मी वीस हजार कोर2 झोडलेले गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बथ2 द्राक्षारस व वीस हजार बथ तेल देईन.”


तेव्हा सोराचा राजा हूराम ह्याने शलमोनाला असे पत्रोत्तर लिहिले की, “परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे म्हणून त्याने आपणाला तिच्यावर राजा नेमले आहे.”


तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसर्‍या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?”


आता माझी गोष्ट अशी आहे की, हे रहस्य मला प्रकट झाले आहे ते मी काही इतर मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे, तर महाराजांना स्वप्नांचा अर्थ प्रकट व्हावा व आपणांला आपल्या मनातील विचार समजावेत म्हणून झाले आहे.


त्याच्या मोटेतून पाणी वाहील. त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल; त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल.


तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील;


Lean sinn:

Sanasan


Sanasan