Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 13:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 करूबारूढ असलेल्या परमेश्वर देवाच्या नामाचा कोश आणावा म्हणून दावीद व सर्व इस्राएल यहूदातले बाला उर्फ किर्याथ-यारीम येथे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 करुबांवरती राहणारा देवाचा कोश, ज्याला परमेश्वर देवाचे नाव ठेवले आहे तो, यहूदातील बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून दावीदासह सर्व इस्राएली तिकडे चढून वर गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 दावीद व इस्राएलचे सर्व लोक यहूदीयातील बालाह म्हणजे किर्याथ-यआरीम येथे करुबांमध्ये आरूढ असलेला, जो त्या नावाने संबोधित केला जातो, तो याहवेह परमेश्वराचा कोश आणण्यासाठी निघाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 13:6
16 Iomraidhean Croise  

मी आपल्या इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासार्थ मंदिर बांधण्यासाठी कोणाही इस्राएल वंशाकडून मी कोणतेही नगर निवडून घेतले नाही, पण माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर दाविदाला मी निवडून नेमले आहे.


हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.


हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस, तो तू कान दे; जो तू करूबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रकट कर.


परमेश्वर राज्य करतो; लोक कंपित होवोत; तो करूबांवर अधिष्ठित आहे; पृथ्वी थरथर कापो.


माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन.


त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक; त्याची अवज्ञा करू नकोस, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे.


तेथे तुला मी भेटत जाईन; आणि इस्राएल लोकांसाठी ज्या काही गोष्टीसंबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे, त्या सर्वांविषयी मी दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील दोन्ही करूबांमधून तुझ्याशी बोलत जाईन.


“सेनाधीश परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस, तूच आकाश व पृथ्वी निर्माण केलीस.


ह्या रीतीने त्यांनी इस्राएल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”


मोशे परमेश्वराशी बोलण्यास दर्शनमंडपात गेला तेव्हा साक्षपटाच्या कोशावर असलेल्या दयासनावरून म्हणजे दोन्ही करूबांमधून झालेली वाणी त्याने ऐकली; ह्या प्रकारे तो त्याच्याशी बोलला.


किर्याथ-बाल (हेच किर्याम-यारीम) व राब्बा; ही दोन नगरे व त्यांखालील खेडी.


तेथून ती सीमा त्या पहाडाच्या माथ्यापासून नफ्तोहाच्या झर्‍यापर्यंत जाते व एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून तेथून बाला उर्फ किर्याथ-यारीम येथपर्यंत पोहचते.


नंतर इस्राएल लोक कूच करत तिसर्‍या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे ही : गिबोन, कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम.


तेव्हा लोकांनी शिलो येथे माणसे पाठवून तेथून सेनाधीश परमेश्वर जो करूबारूढ असतो त्याच्या कराराचा कोश आणवला; देवाच्या कराराच्या कोशाबरोबर एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास हे होते.


मग त्यांनी किर्याथ-यारीमच्या लोकांकडे जासूद पाठवून सांगितले की, “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे तर तो तुम्ही आपल्याकडे घेऊन जा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan