Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 13:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेव्हा उज्जावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने आपला हात कोशाला लावला म्हणून देवाने त्याला ताडन केले व तो त्याच्यापुढे गतप्राण झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा परमेश्वराचा उज्जावर कोप भडकला व उज्जाने कोशाला हात लावला म्हणून त्याने त्यास मारले आणि तेथे तो देवासमोर मेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला आणि त्याने कोशाला हात लावला म्हणून त्यांनी त्याला मारून टाकले. आणि तो परमेश्वरापुढे मरण पावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 13:10
10 Iomraidhean Croise  

परमेश्वराने उज्जाला तडाका दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला, त्याने त्या ठिकाणचे नाव पेरेस-उज्जा (उज्जा-हनन) ठेवले, ते आजवर चालत आहे.


पूर्वीच्या प्रसंगी तुम्ही तो वाहून आणला नाही, आणि आपण आपला देव परमेश्वर ह्याला विधीप्रमाणे भजलो नाही म्हणून त्याने आपल्याला तडाखा दिला.”


मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून आज्ञा केली होती तिला अनुसरून लेव्यांनी त्या कोशाला लावलेल्या काठ्या आपल्या खांद्यांवर घेऊन कोश वाहिला.


मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणार्‍या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.


छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थान व त्यातील सर्व सामान ह्यांवर आच्छादन घालण्याचे काम संपवल्यावर कहाथवंशजांनी ते उचलून न्यायला पुढे यावे; परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये; केला तर ते मरतील. दर्शनमंडपातील जी ओझी कहाथवंशजांनी वाहायची ती हीच.


नंतर नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने याजकांना बोलावून म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला.”


बेथ-शेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला; त्याने त्या लोकांतले पन्नास हजार सत्तर पुरुष जिवे मारले; परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan