Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 13:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दाविदाने सहस्रपती व शतपती ह्यांपैकी प्रत्येक नायकाचा सल्ला घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दावीदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 दावीदाने आपल्या सेनाधिकार्‍यांचा, म्हणजे प्रत्येक सहस्राधिपती, शताधिपतीचा सल्ला घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 13:1
12 Iomraidhean Croise  

नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्राएलातले तीस हजार निवडक पुरुष जमा केले.


मग राजाने यहूदातील व यरुशलेमेतील सर्व वडील जनांना बोलावणे पाठवून जमा केले.


हे गादी सेनानायक होते; त्यांच्यातला कनिष्ठ शंभरांच्या तोडीचा होता व त्यांच्यातला श्रेष्ठ हजारांच्या तोडीचा होता.


तो सिक्लाग येथे गेला तेव्हा मनश्शेतले अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, सिलथय हे मनश्शेचे सहस्रपती फितून त्याच्याकडे गेले.


कालप्रवृत्ती ओळखून इस्राएलाने काय करावे हे ज्यांना कळत होते असे इस्साखार वंशातील दोनशे नायक आले; त्यांचे सर्व भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.


ह्याखेरीज त्यांच्या आसपास जे राहत होते म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली ह्या प्रांतांपर्यंत जे राहत होते त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल आदिकरून भोजनवस्तू, गाढवे, उंट, खेचरे व बैल ह्यांवर लादून आणल्या; त्याप्रमाणेच त्यांनी बैल व शेरडेमेंढरे पुष्कळ आणली, कारण इस्राएलात उत्सव चालला होता.


दावीद इस्राएलाच्या सर्व मंडळीस म्हणाला, “तुम्हांला ठीक वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर ह्याची तशी मर्जी असेल तर इस्राएलाच्या सर्व प्रदेशात जे आपले बाकीचे भाऊबंद आहेत त्यांना आणि नगरात व त्यांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जे याजक व लेवी राहत आहेत त्यांना निरोप पाठवू की, त्यांनी आपल्याला येऊन मिळावे,


शलमोनाने सर्व इस्राएलाला म्हणजे सहस्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्राएलाच्या पितृकुळांचे सर्व नायक ह्यांना सांगितल्यावरून


मग हिज्कीया राजा सकाळी उठून नगराचे सर्व सरदार एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरात गेला.


मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.


ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan