१ इतिहास 12:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 शौलाबरोबर युद्ध करण्यासाठी दावीद पलिष्ट्यांसह आला तेव्हा मनश्शेच्या लोकांपैकी काही लोक दाविदाला सोडून गेले होते. (तरी दाविदाने पलिष्ट्यांना साहाय्य केले नाही, कारण पलिष्ट्यांच्या सरदारांनी आपसांत सल्लामसलत करून त्याला घालवून दिले; ते म्हणाले, “तो आमची शिरे जोखमीत घालून आपला स्वामी शौल ह्याला पुन्हा जाऊन मिळायचा.”) Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मनश्शेचे काहीजणही दावीदाला येऊन मिळाले. तो पलिष्टंयाबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण त्यांनी पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही. कारण पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी आपसात सल्ला करून त्यांनी दावीदाला परत पाठवून दिले. ते म्हणाले, “दावीद जर आपला धनी शौल याच्याकडे परत गेलाच तर आपल्या जीवाला धोका होईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि दावीद पलिष्ट्यांशी शौलाच्या विरुद्ध लढायला गेला तेव्हा मनश्शेह गोत्रातीलही काही लोक दावीदाकडे फितूर झाले. (तरीही दावीद आणि त्याच्या माणसांनी पलिष्ट्यांची मदत केली नाही, कारण सल्लामसलत करून त्यांच्या अधिकार्यांनी त्याला पाठवून दिले. ते म्हणाले, “जर आपला धनी शौल याकडे तो फितूर झाला तर आमची शिरे धोक्यात जातील.”) Faic an caibideil |