Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 12:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग त्या तिसांतला प्रमुख जो अमासय ह्याला आत्म्याने व्यापले व तो म्हणाला, “हे दाविदा, आम्ही आपलेच आहोत; इशायपुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहोत; आपले कुशल असो, कुशल असो; आपल्या साहाय्यकर्त्यांचेही कुशल असो; कारण आपला देव आपला साहाय्यकारी आहे.” ह्यावर दाविदाने त्यांना ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 अमासय याच्यावर आत्मा आला, तो तीस जणांचा प्रमुख होता. तो म्हणाला “दावीदा, आम्ही तुझे आहोत. इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या बाजूचे आहोत. शांती, तुला शांती असो! तुला मदत करणाऱ्यांनाही शांती असो, कारण तुझा देव तुला मदत करतो.” तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तेव्हा त्या तिसांचा पुढारी अमासयवर पवित्र आत्मा आला आणि अमासय म्हणाला: “दावीद महाराज, आम्ही तुमचे आहोत! अहो इशायपुत्र, आम्ही तुमच्या बाजूचे आहोत! तुम्हाला शांती, कल्याण लाभो, आणि जे तुम्हाला मदत करतील, त्या सर्वांना यश लाभो. कारण तुमचे परमेश्वर तुम्हाला मदत करतील.” मग दावीदाने त्यांचा स्वीकार केला आणि त्यांना आपल्या गनिमी युद्धाच्या सेनेवर अधिकारी नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 12:18
31 Iomraidhean Croise  

इत्तयाने राजाला उत्तर केले, “परमेश्वराच्या जीविताची आणि माझ्या स्वामीराजांच्या जीविताची शपथ; प्राण जावो की राहो, जिकडे माझे स्वामीराज जातील तिकडे आपला सेवकही असणार.”


अबशालोमाने यवाबाच्या जागी अमासा ह्याला सेनापती नेमले. यवाबाची आई सरूवा हिची नाहाश म्हणून एक बहीण होती; हिच्या अबीगल नावाच्या कन्येपाशी इथ्रा नावाचा एक इस्राएली पुरुष गेला होता, त्याचा पुत्र हा अमासा होय.


अमासाला सांगा की, तू तर माझ्या हाडामांसाचा ना? तू यवाबाच्या ठिकाणी कायमचा सेनापती झाला नाहीस तर देव माझे त्या मानाने व त्याहूनही अधिक पारिपत्य करो.”’


गतकाली शौल आमच्यावर राजा असता इस्राएल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता; आणि परमेश्वर आपणास म्हणाला होता की, माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”


पण इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने दास करून ठेवले नाही; ते योद्धे, कामदार, सरदार, सेनापती आणि रथ व स्वार ह्यांवरचे अधिपती होते.


तो तेथून निघाल्यावर रेखाबाचा पुत्र यहोनादाब त्याच्या भेटीला येताना त्याला आढळला; त्याने त्याचे क्षेमकुशल विचारल्यावर त्याला म्हटले, “तुझ्याविषयी माझे मन जसे शुद्ध आहे तसे तुझे आहे काय?” यहोनादाब म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “असे असेल तर मला तुझा हात दे.” त्याने त्याला हात दिला आणि आपल्या रथात घेतले.


मग राजाचा खानगी कारभारी, नगरचा अधिकारी, तेथील वडील जन आणि त्या मुलांचे पालन करणारे ह्या सर्वांनी येहूला सांगून पाठवले की, “आम्ही आपले दास आहोत, आपण आम्हांला सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा करणार नाही; आपल्या नजरेला बरे दिसेल ते करा.”


येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, “माझ्या पक्षाचा कोणी आहे काय?” तेव्हा दोघा-तिघा खोज्यांनी त्याच्याकडे खिडकीतून डोकावले.


दाविदाकडे असलेल्या शूर वीरांची नावे ही : हखमोन्याचा पुत्र याशबाम हा तिसांचा1 नायक असून त्याने तीनशे लोकांवर भाला चालवून त्यांना एका प्रसंगी मारून टाकले.


दावीद त्यांना सामोरा जाऊन म्हणाला, “तुम्ही केवळ मित्रभावाने कुमक करण्यासाठी माझ्याकडे आला असल्यास माझे मन तुमच्याशी जडून राहील; पण तुम्ही माझ्याशी दगा करून मला शत्रूंच्या हाती देण्यासाठी आला असाल तर आपल्या पूर्वजांचा देव हे पाहून तुम्हांला शासन करो, कारण माझ्या हातून काही उपद्रव झालेला नाही.”


अबीगईलीस अमासा झाला. अमासाचा बाप येथेर इश्माएली हा होता.


त्याने उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले व आपल्या मस्तकी तारणरूप शिरस्त्राण घातले; सूडरूपी पेहराव तो ल्याला. आवेशरूप झग्याने आपले अंग त्याने झाकले.


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणार्‍या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, ‘आम्ही तुमच्याबरोबर येतो, कारण देव तुमच्याबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”’


जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो.


जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.


सरा व एष्टावोल ह्यांच्या दरम्यान महने-दान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला.


त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्राएलाचा शास्ता झाला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले.


परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला, तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबियेजेरी त्याला येऊन मिळाले.


रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव;


परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमुवेलाने केले व तो बेथलेहेमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडील जन थरथर कापत त्याला भेटायला आले, व त्यांनी त्याला विचारले, “आपण स्नेहभावाने आला आहात काय?”


तो म्हणाला, “मी स्नेहभावाने आलो आहे; मी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझ्याबरोबर यज्ञाला या.” त्याने इशाय व त्याचे पुत्र ह्यांना पवित्र होऊन यज्ञाला येण्याचे आमंत्रण दिले.


तेव्हा शौल आपल्या सभोवतालच्या सेवकांना म्हणाला, “बन्यामिनी लोकहो, ऐका; इशायाचा पुत्र तुम्हा सर्वांना शेते व द्राक्षांचे मळे देणार आहे काय आणि तो तुम्हा सर्वांना सहस्रपती व शतपती करणार आहे काय,


परमेश्वर माझ्यातुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच माझ्याबद्दल आपले शासन करो; पण माझा हात आपल्यावर पडणार नाही.


प्राचीन काळच्या लोकांची म्हण आहे की दुष्टांपासून दुष्टता उद्भवते, पण माझा हात आपल्यावर पडणार नाही.


दाविदाने शौलाशी बोलणे संपवल्यावर शौल म्हणाला, “माझ्या पुत्रा दाविदा, ही तुझीच वाणी काय?” आणि शौल गळा काढून रडू लागला.


त्यांतून कित्येक हजाराहजारांवर व पन्नासापन्नासांवर नायक म्हणून तो नेमील; कित्येकांना आपली शेते नांगरायला, कापायला व आपल्या लढाईची व रथाची हत्यारे करण्याच्या कामाला लावील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan