Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 यबूस येथल्या रहिवाशांनी दाविदाला सांगितले की, “तू येथे येऊ नकोस.” तथापि दाविदाने सीयोन नावाचा गड सर केला; त्यालाच दावीदपूर म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 यबूसचा रहिवासी दावीदाला म्हणाला, “तू येथे येणार नाहीस.” पण तरीही दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. हेच दावीदाचे नगर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तिथे राहणारे यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही.” तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 11:5
26 Iomraidhean Croise  

दावीद त्या गडावर राहू लागला; त्याला दावीदपूर हे नाव पडले. दाविदाने मिल्लो बुरुजापासून आतल्या बाजूस सभोवार तटबंदी केली.


दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना; त्याने तो ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला.


परमेश्वराने ओबेद-अदोम ह्याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले; तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला.


मग शलमोन राजाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे सीयोनातून वरती आणण्यासाठी इस्राएलाचे वडील जन, वंशांचे सर्व प्रमुख व सर्व पितृकुळांचे सरदार ह्यांना शलमोन राजाकडे यरुशलेमेत जमा केले.


नंतर दावीद व सर्व इस्राएल लोक यरुशलेमेस गेले (ह्यालाच यबूस असे म्हणतात); त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत असत.


दावीद म्हणाला, “जो कोणी सर्वांच्या आधी यबूसी लोकांना मार देईल तो मुख्य सेनापती होईल.” सरूवेचा पुत्र यवाब हा प्रथम चढाई करून गेला म्हणून त्याला सेनापती केले.


दावीद त्या गडात राहू लागला म्हणून त्याचे नाव दावीदपूर पडले.


मग शलमोनाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे अर्थात सीयोनातून वरती आणण्यासाठी इस्राएलाचे वडील जन, वंशांचे सर्व मुख्य, आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे सरदार ह्यांना यरुशलेमेत जमा केले.


कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत.


परमेश्वराने सीयोन निवडून घेतली आहे, आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे.


तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.”


उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे.


तर यहूदाचा वंश त्याने पसंत केला; आपणाला प्रिय जो सीयोन डोंगर तो त्याने पसंत केला.


याकोबाच्या सर्व वसतिस्थानांहून सीयोनेची द्वारे त्याला अधिक प्रिय आहेत.


सीयोनेविषयी म्हणतील की, हा आणि तो तिच्यातच जन्मले होते, आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.


सीयोननिवासी परमेश्वराचे स्तवन करा, त्याची कृत्ये राष्ट्राराष्ट्रांत विदित करा;


त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सीयोनात ठेवतो; त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजीत होणार नाही.”


पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत,


नंतर मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव ‘कपाळावर’ लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते;


पण तो माणूस त्या रात्री तेथे राहीना; तो उठून मार्गस्थ झाला. तो खोगीर घातलेली आपली दोन गाढवे आणि आपली उपपत्नी ह्यांच्यासह यबूसच्या म्हणजे यरुशलेमेच्या जवळ आला.


आसपास उभे असणार्‍या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्‍या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?”


आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan