Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्या प्रकारे इस्राएल लोकांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दाविदाने त्यांच्याशी परमेश्वरासमोर हेब्रोनात करार केला आणि परमेश्वराने शमुवेलाच्या द्वारे सांगितले होते त्या वचनानुसार त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 असे इस्राएल लोकांचे सर्व वडील राजाकडे हेब्रोन येथे आले आणि दावीदाने परमेश्वरासमोर त्यांच्याशी हेब्रोनात करार केला. तेव्हा त्यांनी दावीदाला इस्राएलावर राजा होण्यास अभिषेक केला. याप्रकारे शमुवेलाने सांगितलेले परमेश्वराचे वचन खरे ठरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले होते, तेव्हा त्याने याहवेहसमोर हेब्रोन येथे त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांनी दावीदाचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला, जसे याहवेहने शमुवेलद्वारे वचन दिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 11:3
15 Iomraidhean Croise  

यहूदी लोकांनी तेथे जाऊन दाविदाला अभिषेक करून यहूदाच्या वंशाचा राजा नेमले. दाविदाला त्यांनी सांगितले की, “शौलाला ज्यांनी मूठमाती दिली ते याबेश-गिलादाचे लोक होते.”


ह्या प्रकारे इस्राएलांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलांवर राजा नेमले.


साडेसात वर्षे त्याने हेब्रोनात यहूदावर राज्य केले आणि तेहेतीस वर्षे यरुशलेमेत सर्व इस्राएल व यहूदा ह्यांच्यावर राज्य केले.


ह्यानंतर राजा व प्रजा ह्यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्यांच्याकडून परमेश्वराशी करार करवला; तसाच त्याने राजा व प्रजा ह्यांच्यामध्येही करार करवला.


त्याच्या चाकरांनी त्याचे प्रेत रथावर घालून मगिद्दो येथून यरुशलेमेस पोहचवले; त्याने स्वतः केलेल्या थडग्यात त्यांनी त्याला मूठमाती दिली. मग देशातील लोकांनी योशीयाचा पुत्र यहोआहाज ह्याला अभिषेक करून त्याच्या बापाच्या जागी राजा केले.


इस्राएलाविषयी परमेश्वर बोलला होता त्यानुसार दाविदाच्या ज्या शूर वीरांनी त्याच्या पक्षाचे होऊन त्याला गादी मिळवून देण्यात साहाय्य केले ते प्रमुख पुरुष हे होत.


सर्व मंडळीने देवाच्या मंदिरात राजाशी करार केला. यहोयादा त्यांना म्हणाला, “दाविदाच्या वंशजांविषयी परमेश्वराने सांगितले आहे त्याप्रमाणे राजपुत्राने गादीवर बसावे.


मग इफ्ताह गिलादाच्या वडील जनांबरोबर गेला; लोकांनी त्याला आपला प्रमुख व सेनापती नेमले. तेव्हा इफ्ताहाने आपले सगळे म्हणणे मिस्पा येथे परमेश्वरासमक्ष परत बोलून दाखवले.


तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले व तेथे त्यांनी परमेश्वरासमोर शौलाला राजा केले; तेथे त्यांनी परमेश्वराला शांत्यर्पणाचे यज्ञ केले; शौल व इस्राएल लोक ह्यांनी तेथे मोठा उत्सव केला.


तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “परमेश्वराने इस्राएलावरील तुझे राजपद तुझ्यापासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे.


मग परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “मी शौलाला इस्राएलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार? शिंगात तेल भरून चल; मी तुला इशाय बेथलेहेमकर ह्याच्याकडे पाठवतो; कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरता राजा निवडले आहे.”


मग यज्ञासाठी येण्याचे इशायास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करायचे ते मी सांगेन; मी तुला सांगेन त्याला तू माझ्यासाठी अभिषेक कर.”


त्या दोघांनी परमेश्वरापुढे करार केला; मग दावीद त्या उंचवट्यावरील झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला.


परमेश्वराने माझ्या द्वारे मोशेला सांगितले होते तसेच त्याने आपल्या मनोदयाप्रमाणे केले आहे; परमेश्वराने तुझ्या हातून राज्य हिसकावून घेऊन तुझा शेजारी दावीद ह्याला दिले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan