Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 गतकाळी शौल आमच्यावर राजा असताना इस्राएलाची ने-आण करणारे अग्रणी आपणच होता; आणि आपला देव परमेश्वर आपणाला म्हणाला होता की, ‘माझी प्रजा इस्राएल ह्यांचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मागील दिवसात, शौल जेव्हा आमच्यावर राजा होता, तेव्हा लढाईत तू इस्राएलाचे नेतृत्व केले आहेस. परमेश्वर तुझा देव तुला म्हणाला, ‘तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मागील काळात, जेव्हा शौल राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 11:2
16 Iomraidhean Croise  

गतकाली शौल आमच्यावर राजा असता इस्राएल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता; आणि परमेश्वर आपणास म्हणाला होता की, माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”


मी इस्राएल लोकांसह जिकडे जिकडे भ्रमण करीत फिरलो तिकडे तिकडे ज्या कोणा इस्राएल वंशाला इस्राएल लोकांची जोपासना करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यांना तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे मंदिर का बांधले नाही असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय?


जा, यराबामाला सांग, इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, मी तुला लोकांतून निवडून उन्नत केले, माझे लोक इस्राएल ह्यांचा तुला मी नायक नेमले,


ह्यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे म्हणजे मला बर्‍यावाइटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे?”


आपली प्रजा म्हणजे याकोबवंश, आपले वतन म्हणजे इस्राएलवंश ह्यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्यांमागे तो होता तेथून त्याने त्यांना आणले.


मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्‍यांना सांभाळून नेईल.


पाहा, मी त्याला राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमले आहे


मी तुम्हांला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; ते तुम्हांला ज्ञान व अक्कल ह्यांनी तृप्त करतील.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल.


तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल; तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा-मेंढरांप्रमाणे होणार नाही.”


‘हे यहूदाच्या प्रांता, बेथलेहेमा, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही; कारण माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल.”’


तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याची वाणी ओळखतात.


मग परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “मी शौलाला इस्राएलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार? शिंगात तेल भरून चल; मी तुला इशाय बेथलेहेमकर ह्याच्याकडे पाठवतो; कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरता राजा निवडले आहे.”


मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल उठून रामास गेला.


मग शौलाने दाविदाला आपल्यापासून दूर करून सहस्रपती नेमले; तो लोकांच्या पुढे चालत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan