Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 11:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 इस्राएलाविषयी परमेश्वर बोलला होता त्यानुसार दाविदाच्या ज्या शूर वीरांनी त्याच्या पक्षाचे होऊन त्याला गादी मिळवून देण्यात साहाय्य केले ते प्रमुख पुरुष हे होत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 हे दावीदाजवळच्या पुढाऱ्यांतील होते, इस्राएलाविषयी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास राजा करावे म्हणून समस्त इस्राएलाबरोबर त्याच्या राज्यात खंबीर राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दावीदाच्या काही अत्यंत शूर योद्ध्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—याहवेहच्या कराराप्रमाणे या योद्ध्यांनी इस्राएली पुढार्‍यांसह राज्याची वाढ करण्यासाठी त्याला मजबूत आधार दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 11:10
13 Iomraidhean Croise  

अबनेर दाविदाला म्हणाला, “मी आता जातो आणि सर्व इस्राएल लोकांना माझ्या स्वामीराजांजवळ जमा करतो, म्हणजे ते आपणाशी करार करतील; मग ज्यांच्यावर राज्य करावे अशी आपली इच्छा आहे त्या सर्वांवर आपण राज्य कराल.” दाविदाने अबनेराची रवानगी केली; व तो सुखरूप निघून गेला.


ह्या प्रकारे इस्राएल लोकांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दाविदाने त्यांच्याशी परमेश्वरासमोर हेब्रोनात करार केला आणि परमेश्वराने शमुवेलाच्या द्वारे सांगितले होते त्या वचनानुसार त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा नेमले.


त्यांनी लुटारूंच्या टोळीपासून दाविदाचे रक्षण केले; ते सर्व शूर वीर असून सेनानायक होते.


परमेश्वराच्या वचनानुसार शौलाचे राज्य दाविदाच्या हाती द्यावे म्हणून जे लोक युद्ध करण्यासाठी हत्यारबंद होऊन हेब्रोन येथे त्याच्याकडे आले त्यांच्या प्रमुखांची गणती ही :


यहूदी लोकांतले ढालबरची धारण करणारे, लढण्या-साठी हत्यारबंद झालेले लोक सहा हजार आठशे,


हे सर्व व्यूहरचना करणारे योद्धे दाविदाला सर्व इस्राएलाचा राजा करावे म्हणून हेब्रोन येथे खर्‍या मनाने आले; दाविदाला राजा करावे म्हणून वरकड सर्व इस्राएल लोकही एकदिल झाले.


ते तेथे तीन दिवस दाविदाबरोबर खातपीत राहिले, कारण त्यांच्या भाऊबंदांनी त्यांच्यासाठी सर्व सामग्री तयार केली होती.


इस्राएल लोकांची गणती म्हणजे पितृकुळांतील मुख्य पुरुष, सहस्रपती, शतपती व त्यांचे सरदार ह्यांची आणि जे वर्षभर प्रतिमासी कामावर हजर होते, सुटी मिळाली म्हणजे जात व अशा प्रकारे राजाची सेवाचाकरी करीत त्यांची प्रत्येक वर्गाप्रमाणे गणती चोवीस हजार होती.


इस्राएलाचे सर्व सरदार म्हणजे वंशावंशांचे सरदार, राजाची पाळीपाळीने सेवा करणार्‍या तुकड्यांचे सरदार होते; तसेच सहस्रपती, शतपती, राजा व त्याचे पुत्र ह्यांच्या संपत्ती व पशुधनावर देखरेख करणारे सरदार आणि शूर वीर ह्या सर्वांना दाविदाने यरुशलेम येथे जमवले.


मग परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “मी शौलाला इस्राएलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार? शिंगात तेल भरून चल; मी तुला इशाय बेथलेहेमकर ह्याच्याकडे पाठवतो; कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरता राजा निवडले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan