Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 खोर्‍यात असलेल्या सर्व इस्राएल लोकांनी पाहिले की लढवय्ये पळाले आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले, तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यांत जाऊन राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जेव्हा खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक इस्राएल मनुष्याने पाहिले की, शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत आणि त्यांनी पळ काढला. तेव्हा त्यांनीही आपली नगरे सोडून पळ काढला. नंतर पलिष्टी आले आणि त्यामध्ये राहू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जेव्हा खोर्‍यात असलेल्या इस्राएली लोकांनी पाहिले की सैन्याने पळ काढला आहे आणि शौल आणि त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची नगरे सोडली आणि तिथून पलायन केले. पलिष्ट्यांनी येऊन तिथे वस्ती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 10:7
9 Iomraidhean Croise  

ह्याप्रमाणे शौल व त्याचे तिघे पुत्र व त्याच्या घरची माणसे मृत्यू पावली.


दुसर्‍या दिवशी पलिष्टी लोक वधलेल्यांना लुटायला आले तेव्हा शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले त्यांना आढळले.


मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्रस्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही.


तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की, उडणार्‍या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील; तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीस लागले नसताही ते पळतील.


तुझ्या भूमीचे उत्पन्न व तुझ्या सार्‍या श्रमाचे फळ तुला अपरिचित असलेले राष्ट्र खाऊन टाकील आणि तुझा निरंतर छळ होऊन तू रगडला जाशील.


तुझ्याबरोबर राहणार्‍या उपर्‍याची तुझ्यापेक्षा अधिकाधिक उन्नती होत जाईल.


मिद्यानाचा हात इस्राएलावर प्रबळ झाला; मिद्यानाच्या भीतीने इस्राएल लोकांनी डोंगराडोंगरातून आपल्यासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले.


आपण पेचात सापडलो आहोत असे इस्राएल लोकांनी पाहिले, (खरोखरच त्या लोकांना संकट प्राप्त झाले होते,) तेव्हा ते गुहा, झुडपे, खडक, दुर्ग व विवरे ह्यांत लपले.


खोर्‍यांच्या पलीकडे आणि यार्देनेच्या पलीकडे जे इस्राएल लोक होते त्यांनी पाहिले की इस्राएल लोक पळाले आहेत आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यांत जाऊन राहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan