Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 10:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक; तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना, तो फार घाबरला होता; तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 नंतर शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार काढ आणि तिने मला जोराने आरपार भोसक. नाहीतर हे बेसुंती येऊन माझ्याशी वाइट रीतीने वागतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करण्यास तयार झाला नाही, तो फार घाबरला होता. म्हणून शौलाने स्वत:ची तलवार काढली आणि तिच्यावर तो पडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने त्याची स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 10:4
19 Iomraidhean Croise  

गथात हे सांगू नका, अष्कलोनच्या आळ्यांत हे जाहीर करू नका; पलिष्ट्यांच्या कन्या आनंदित होतील, बेसुंत्यांच्या कन्या जयघोष करतील; असे न होवो.


तो बातमी आणणारा तरुण म्हणाला, “मी सहज गिलबोवाच्या डोंगरात फिरत असता शौल आपल्या भाल्यावर टेकलेला आहे आणि रथ व स्वार त्याच्या पाठीशी येऊन अगदी भिडले आहेत असे मला दिसले.


आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहीथोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला, आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला; तो मृत्यू पावला, व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले.


नगर हस्तगत झाले असे जिम्रीने पाहिले तेव्हा तो राजवाड्याच्या बुरुजात गेला व त्याने राजवाड्यास आग लावून दिली आणि त्यात तो स्वतःही जळून मेला.


शौलाशीही लढाई फार निकराची झाली; तिरंदाजांनी त्याला गाठले व त्याच्यामुळे तो फार हैराण झाला.


शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तलवारीवर पडून त्याच्याबरोबर मेला.


(त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले; तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली.


तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता.


नंतर त्याला फार तहान लागल्यामुळे तो परमेश्वराचा धावा करत म्हणाला, “तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिलास खरा, पण मी आता तहानेने तडफडून मरावे आणि बेसुनत लोकांच्या हाती पडावे काय?”


पलिष्ट्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळायला लावले.


तेव्हा त्याने घाईघाईने आपल्या शस्त्रवाहक तरुणाला बोलावून म्हटले, “आपली तलवार उपसून मला छाटून टाक, नाहीतर एका बाईने ह्याला जिवे मारले असे लोक म्हणतील.” त्या तरुणाने त्याला भोसकले तेव्हा तो मरण पावला.


तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हटले, “चल, आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ; कदाचित परमेश्वर आपले कार्य करील; परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास अडचण नाही.”


आसपास उभे असणार्‍या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्‍या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?”


आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.”


तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक, तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना; तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan