Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 10:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तेव्हा तेथले सर्व शूर वीर निघाले आणि त्यांनी शौल व त्याचे पुत्र ह्यांची प्रेते याबेश येथे आणली व त्यांच्या अस्थी घेऊन याबेशातील एका वृक्षाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तेव्हा त्यांच्यातील सर्व सैनिक शौल आणि त्याची अपत्ये यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश येथे आणले. याबेश येथे एका मोठ्या एला वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तेव्हा त्यांचे सर्व शूर पुरुष रणांगणावर गेले व त्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचे मृतदेह याबेश येथे परत आणले. त्यांच्या अस्थी याबेश येथील एला झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 10:12
10 Iomraidhean Croise  

अब्राम त्या देशातून शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते.


रिबकेची दाई दबोरा ही मरण पावली व तिला बेथेलच्या खालच्या बाजूस अल्लोन वृक्षाखाली पुरले; ह्या वृक्षाचे अल्लोन-बाकूथ (रुदनवृक्ष) असे नाव ठेवले.


यार्देनेपलीकडे अटादाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा त्यांनी तेथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाने तेथे आपल्या बापासाठी फार आकांत करून सात दिवस शोक केला.


दिवस अजून थोडा उरला होता, तेव्हा सर्व लोक दाविदाने अन्न खावे म्हणून त्याला आग्रह करण्यासाठी आले; पण दावीद शपथ घेऊन म्हणाला, “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा काही खाल्ले तर देव मला तसेच किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.”


पलिष्ट्यांनी शौलाचे जे काही केले ते सगळे याबेश गिलादाच्या सर्व रहिवाशांनी ऐकले,


तेथे यहूद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरीया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते.


नंतर अम्मोनी नाहाश ह्याने स्वारी करून याबेश-गिलादासमोर तळ दिला; तेव्हा याबेशचे सर्व लोक नाहाश ह्याला म्हणाले की, “आमच्याशी करारमदार कर म्हणजे आम्ही तुझे अंकित होऊ.”


त्यांनी त्या आलेल्या जासुदांना सांगितले, “तुम्ही याबेश-गिलादाच्या लोकांना जाऊन सांगा की, ‘उद्या ऊन होण्याच्या सुमारास तुम्हांला कुमक येऊन पोहचेल.” त्या जासुदांनी जाऊन याबेशच्या लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांना फार आनंद झाला.


तेव्हा तेथले सर्व शूर वीर निघाले, आणि रातोरात जाऊन त्यांनी शौल व त्याचे पुत्र ह्यांची प्रेते बेथ-शानाच्या गावकुसावरून काढून याबेश येथे आणली व दहन केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan