Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 3:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 ख्रिस्ती लोकांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, आज्ञाधारक असावे, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 त्यांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 त्यांना असे सुचव की त्यांनी सरकारी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन रहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आपल्या लोकांना आठवण करून दे की, सत्ता व अधिकारी यांच्या अधीन राहून आज्ञापालन करावे आणि चांगल्या कार्याकरिता नेहमी सिद्ध असावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 3:1
29 Iomraidhean Croise  

ते म्हणाले, “कैसरचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.”


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, स्थिर आणि अढळ राहा. प्रभूच्या कार्यात सतत मग्न राहा; कारण तुम्ही जाणून आहात की, प्रभूमध्ये तुम्ही केलेले श्रम कधीच व्यर्थ ठरणार नाहीत.


आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपली निर्मिती करण्यात आली आहे. आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये करीत आपण आपले जीवन जगावे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहेत.


आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही नीतिमत्त्वाच्या फळांनी भरून जावे.


अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला प्रसन्न करण्याकरता त्याला शोभेल असे वागावे; म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाविषयीच्या पूर्ण ज्ञानात तुमची वृद्धी व्हावी.


राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता प्रार्थना करावी, ह्यासाठी की, पूर्ण भक्तीने व सदाचाराने आपण स्वस्थपणाचे व शांतीचे आयुष्यक्रमण करावे.


ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी आध्यात्मिक पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.


शिवाय तिचे एकदाच लग्न झालेले असावे व सत्कृत्यांसाठी, मुलाबाळांचा सांभाळ, पाहुणचार, पवित्र लोकांची नम्र सेवा, संकटग्रस्तांना साहाय्य ह्यासाठी ती नावाजलेली असावी.


मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान मी तुझ्यावर हात ठेवून केलेल्या प्रार्थनेमुळे तुझ्यामध्ये आहे, ते प्रज्वलित कर;


तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण करून दे, त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, वितंडवाद करू नका. तो कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो.


जर कोणी दुष्टपणापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो सन्मानासाठी पवित्र केलेले, प्रभूला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामाकरिता तयार केलेले असे पात्र होईल.


आपण देवाला ओळखतो असे ते जाहीर करतात परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते तिरस्करणीय व आज्ञाभंग करणारे असून प्रत्येक चांगल्या कामासाठी अपात्र आहेत.


आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक स्वतःकरिता शुद्ध करून ठेवण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केले.


आपल्या लोकांनी आपल्या निकडीच्या गरजा पुरविल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.


हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत राहावे, अशी माझी इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करीत राहावे कारण ही कृत्ये सर्वांकरता उचित व हितकारक आहेत


तो देव त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याकरिता आवश्यक अशा सर्व चांगल्या गोष्टी तुम्हांला पुरवो व त्याला जे आवडते, ते तो येशू ख्रिस्ताद्वारे आपणामध्ये घडवून आणो. ख्रिस्ताचा युगानुयुगे गौरव असो. आमेन.


ह्या कारणासाठी जरी तुम्हांला ह्या गोष्टी माहीत आहेत आणि तुम्हांला प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहात


प्रभूने इजिप्त देशातून आपल्या लोकांना मुक्त केले परंतु नंतर जे विश्वासहीन झाले, त्यांचा त्याने नाश केला, हे तुम्हांला ठाऊक आहेच. तरीही मी तुम्हांला त्याची आठवण करून देऊ इच्छितो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan