Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 1:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 हे सत्य शाश्वत जीवनाच्या आशेवर आधारलेले असून सत्यवचनी परमेश्वराने काळाच्या प्रारंभापूर्वी ह्या जीवनाचे अभिवचन आम्हांला दिले

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जे युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणार्‍या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जे सर्वकाळचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 परमेश्वर जे कधीही खोटे बोलत नाहीत, त्यांनी सार्वकालिक जीवनाच्या आशेचे अभिवचन सुरवातीच्या काळाच्या आधीपासून दिले

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 1:2
46 Iomraidhean Croise  

मग राजा त्याच्या उजवीकडच्यांना म्हणेल, “अहो, माझ्या पित्याचा आशीर्वाद लाभलेल्या लोकांनो, या. जे राज्य जगाच्या निर्मितीपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या.


तर मग ह्यांना अनंत शिक्षा भोगायला पाठवले जाईल आणि नीतिमान शाश्वत जीवन उपभोगायला जातील.”


तो बाहेर पडून रस्त्याने पुढे गेल्यावर एकाने धावत येऊन व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! शाश्वत जीवनाचे वतन मिळवता यावे म्हणून मी काय केले पाहिजे?”


अशा प्रत्येकाला आताच्या काळात छळवणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, माता, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात शाश्वत जीवन हे सारे मिळेल.


मी त्यांना शाश्वत जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातांतून कोणी हिसकावून घेणार नाही.


तू त्याला जे दिले आहेत त्या सर्वांना त्याने शाश्वत जीवन द्यावे म्हणून तू सर्व मनुष्यमात्रांवर त्याला अधिकार दिला आहेस.


जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस म्हणून हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे, तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की, जे माझे वैभव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे.


तुम्ही धर्मशास्त्रलेख शोधून पाहता कारण त्याच्याद्वारे तुम्हांला शाश्वत जीवन प्राप्त होईल, असे तुम्हांला वाटते. ते माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.


जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो, त्याला शाश्वत जीवन लाभले आहे आणि मी स्वतः त्याला शेवटच्या दिवशी उठवीन.


शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार? शाश्वत जीवन देणारी वचने आपल्याजवळ आहेत.


हे जे त्याने युगादियुगाच्या सुरवातीपासून विदित केले आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.


हे शुभवर्तमान देवाचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त, ह्याच्याविषयी आहे. ह्या शुभवर्तमानाविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांद्वारे पूर्वीच अभिवचन दिले होते.


आपण देवाचा गौरव करू या. तुम्हांला तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास तो समर्थ आहे. येशू ख्रिस्ताविषयीचे जे शुभवर्तमान मी घोषित करतो त्यानुसार व जे रहस्य गत युगात गुप्त ठेवलेले होते, परंतु आता जे प्रकट करण्यात आले आहे त्यानुसार तो हे करीत आहे.


जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अमरत्व हे सारे मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो शाश्वत जीवन देईल.


आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्या कृपेत आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या वैभवात सहभागी होण्याची आशा बाळगतो.


तर मग जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे देवाची कृपा नीतिमत्त्वाच्यायोगे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करते.


धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते.


पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शाश्वत जीवन आहे.


हे गौरवशाली रहस्य त्याच्या लोकांना कळविण्यात यावे, ही देवाची योजना आहे. गौरवशाली आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तो हे रहस्य आहे.


यहुदी लोकांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही ठार मारले आणि आमचा छळ करून आम्हांला बाहेर घालविले. ते देवाला जे प्रिय आहे, ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधक झाले आहेत.


परंतु आपण दिवसाचे आहोत म्हणून आपण सावध असावे. आपण विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.


श्रद्धेचे सुयुद्ध लढत रहा. स्वतःसाठी शाश्वत जीवन मिळव. त्यासाठीच तुला पाचारण करण्यात आले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तुझी श्रद्धा जाहीरपणे स्वीकारली आहेस.


अशा प्रकारे ते असा काही साठा जमवितील की, तो त्यांच्या भवितव्यासाठी भरभक्कम पाया ठरेल व त्यामुळे ते खरे शाश्वत जीवन मिळवू शकतील.


देवाच्या इच्छेने व ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाच्या वचनानुसार येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून,


त्याने आपल्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने आमंत्रित केले आहे. ही कृपा काळाच्या प्रारंभापूर्वी ख्रिस्त येशूद्वारे आपल्यावर करण्यात आली.


निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण शाश्वत गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सहन करतो.


आपण अविश्वासी झालो, तरीही तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही.


सत्याचे वचन दक्षतेने सांगणारा व स्वतःच्या सेवाकार्याची लाज न बाळगणारा असा देवाच्या पसंतीला उतरलेला कामगार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कर.


सर्व गोष्टींविषयी चांगल्या वर्तणुकीचा आदर्श, असे स्वतःला सादर कर. तुझी शिकवण प्रामाणिक व गंभीर स्वरूपाची असू दे.


ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करून ज्या शाश्वत जीवनाची आपण आशा धरली आहे, ती प्राप्त करून घ्यावी.


जे अभिवचन ख्रिस्ताने स्वतः आपल्याला दिले आहे, ते शाश्वत जीवन होय.


आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे, त्या परमेश्वराला ओळखण्याची समज त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबरच्या ऐक्यात आपण जीवन जगत आहोत. हाच खरा देव आहे आणि हेच खरे शाश्वत जीवन आहे.


शाश्वत जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा आणि आपल्याला देवाच्या प्रीतीमध्ये राखा.


जगाच्या स्थापनेपासून ज्या कोणाची नावे वधलेल्या कोकराजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, त्यांना सोडून पृथ्वीवर राहणारे इतर सर्व जण त्या श्वापदाची आराधना करतील.


जे श्वापद तू पाहिले, ते अस्तित्वात होते परंतु आता नाही. ते अथांग विवरातून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना, ते श्वापद पूर्वी होते, आता नाही तरीही पुन्हा अवतरले, असे पाहून आश्चर्य वाटेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan