Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 2:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 किंवा देवाचा चांगुलपणा तुला पश्चात्ताप करायला लावणारा आहे हे न समजून तू त्याचा चांगुलपणा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्यांचा विपुल दयाळूपणा, धीर आणि सहनशीलता यांचा अवमान करून परमेश्वराची दया तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे तुला समजत नाही का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 2:4
51 Iomraidhean Croise  

कित्येक लोक ज्याला विलंब म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा, अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा आहे.


म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा, पवित्र लोकांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी


ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या तुमच्याआमच्याविषयीच्या सदिच्छेद्वारे पुढे येणाऱ्या सर्व युगांत त्याने आपल्या कृपेची समृद्धी दाखवावी म्हणून त्याने हे केले.


त्याच्या कृपेच्या समृद्धीनुसार त्याच्या रक्‍ताद्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे अपराधांची आपल्याला क्षमा मिळाली आहे.


त्याच्या आत्मबलिदानाद्वारे त्याने सर्वांसाठी क्षमा मिळवावी व ख्रिस्तावरील श्रद्धेने सर्वांनी ही क्षमा आपलीशी करावी म्हणून देवाने ख्रिस्त अर्पण केला. देवाने हे अशासाठी केले की, तो स्वतः नीतिमान आहे हे त्याला दाखवून द्यावयाचे होते. पूर्वी त्याने पापांकडे सहनशीलतेने व दयादृष्टीने पाहिले परंतु आता पापांच्या क्षमेसाठी तो त्याचे नीतिमत्व दाखवू इच्छितो. अशा प्रकारे तो दाखवून देतो की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात व हेच त्याचे नीतिमत्त्व आहे.


आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे.


अहाहा, देवाच्या सुज्ञतेची व ज्ञानाची समृद्धी किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती अनाकलनीय आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!


देवाची ममता व कठोरता पाहा, पतन झालेल्यांविषयी कठोरपणा आणि तुझ्यासाठी त्याची ममता. मात्र तू त्याच्या ममतेत राहशील तर, अन्यथा तूही छाटून टाकला जाशील.


परंतु देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या विपुल प्रीतीमुळे,


सर्वप्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे व उपहास करणारे लोक शेवटच्या दिवसात चेष्टा करीत म्हणतील,


हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहनशीलतेने वाट पाहत होता, त्या वेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच होत. त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचविण्यात आले होते.


प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, त्यांनी गर्विष्ठ होऊ नये, चंचल धनावर भिस्त ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर भिस्त ठेवावी.


माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील.


ऐक! मी दाराशी उभा आहे व ठोठावत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याकडे जाईन व त्याच्याबरोबर मी आणि माझ्याबरोबर तो जेवील.


जे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्तावर पुढे विश्वास ठेवणार आहेत, त्यांना दाखला मिळावा म्हणून, मी जो सर्वांत अधिक पापी, त्या माझ्या बाबतीत येशू ख्रिस्ताने सर्वात जास्त धीर दाखवावा ह्याच कारणाकरिता माझ्यावर दया करण्यात आली.


हे गौरवशाली रहस्य त्याच्या लोकांना कळविण्यात यावे, ही देवाची योजना आहे. गौरवशाली आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तो हे रहस्य आहे.


तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही!


तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय?


ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रीतीने एकमेकांना ते जोडले जावेत, ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाच्या, म्हणजे पित्याच्या व ख्रिस्ताच्या रहस्याचे, पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे.


त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीनुसार तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे.


सर्व पवित्र लोकांतील कनिष्ठ अशा माझ्यावर ही कृपा अशाकरिता झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीचे शुभवर्तमान यहुदीतर लोकांकरिता घेऊन जावे


यहुदी व ग्रीक ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात, त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्न आहे.


संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यांमध्ये त्यांची उदंड उदारवृत्ती दिसून आली.


आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या शाश्वत राज्यात पूर्ण हक्काने तुमचा प्रवेश होईल.


तिने पश्चात्ताप करावा म्हणून मी तिला वेळ दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याची तिची इच्छा नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan