Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 12:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेनुसार आपल्याला विविध कृपादाने मिळाली आहेत. आपल्या विश्वासाच्या प्रमाणात संदेश देणाऱ्याने संदेश देण्यात,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पण आपल्याला पुरविलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत; जर ते परमेश्वराचा संदेश देणे असेल तर विश्वासाच्या परिमाणानुसार आपण संदेश द्यावेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आपल्या सर्वांना जी कृपा दिली आहे, त्यानुसार आपल्याला वेगवेगळी दाने दिली आहेत. जर तुम्हाला परमेश्वराचे संदेश सांगण्याचे कृपादान असेल, तर तो संदेश आपल्या विश्वासानुसार सांगा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 12:6
31 Iomraidhean Croise  

खरे म्हणजे मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे, अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवाकडून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे.


मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःचे मूल्यमापन करा.


तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे.


संदेश देण्याचे कृपादान जरी मला लाभलेले असले, सर्व रहस्ये व सर्व विद्या मला अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका माझा विश्वास दृढ असला आणि माझ्या मध्ये प्रीती नसली, तर मी शून्य आहे.


आणि त्यानेच काहींना प्रेषित, काहींना संदेष्टे, काहींना शुभवर्तमानप्रचारक, काहींना पाळक व शिक्षक असे नेमले.


प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला देवाचा संदेश सांगता यावा अशी उत्कंठा बाळगा.


जर तुम्ही द्यायला उत्सुक असाल, तर देण्यासाठी तुमच्याजवळ जे आहे त्यानुसार, जे नाही त्यानुसार नव्हे, परमेश्वर तुमचे दान स्वीकारील.


संदेष्ट्यांच्या शद्बांचा तिरस्कार करू नका.


संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा.


यहुदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते म्हणून त्यांनी बराच वेळ बोलून बंधुजनांस धैर्य व शक्ती देणारा बोध केला.


देव म्हणतो, ‘शेवटच्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या माझा संदेश घोषित करतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील,


जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी परंतु तुमची एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती असली, तर देव तेही तुम्हांला दाखवील.


ते रहस्य जसे आता आत्म्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रकट करून दाखविले आहे, तसे ते इतर पिढ्यांना कळविण्यात आले नव्हते.


अंत्युखिया येथील ख्रिस्तमंडळीत बर्णबा, निग्र म्हटलेला शिमोन, लूक्य कुरेनेकर, हेरोद राज्यपालाच्या सहवासात वाढलेला मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते.


ह्यावरून देवाच्या शहाणपणाने स्पष्ट केले आहे, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यांतील कित्येकांना ते ठार मारतील व कित्येकांना छळतील.’


पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो, तुम्ही त्यांच्यातील काही जणांना ठार माराल व क्रुसावर खिळाल आणि इतरांना तुम्ही तुमच्या सभास्थानांत फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल.


परंतु सर्वच जण देवाचा संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा बाहेरचा माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापांविषयी त्याची खातरी होते, तो जे काही ऐकतो त्या सर्वावरून त्याचा निर्णय होतो,


त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत.


तर मग अपुल्लोस कोण, पौल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, असे ते सेवक आहेत. ते प्रभूने नेमून दिल्याप्रमाणे आपले कार्य करीत आहेत.


देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव जोडून ठेवला आहे.


प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही परमेश्वरप्रेरित संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही.


त्यानंतर ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे दोन हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी दोन हजार मिळविल्या आहेत.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan