Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 ख्रिस्त येशूचा सेवक आणि देवाने शुभवर्तमान घोषित करण्याकरिता निवडलेला व पाचारण केलेला प्रेषित पौल ह्याच्याकडून:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मी पौल, ख्रिस्त येशूंचा दास, प्रेषित होण्यास पाचारलेला आणि परमेश्वराच्या शुभवार्तेसाठी वेगळा केलेला

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 1:1
73 Iomraidhean Croise  

योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत गालीलमध्ये आला व म्हणाला,


जर कोणाला माझी सेवा करायची असेल, तर त्याने मला अनुसरणे आवश्यक आहे. म्हणजे जेथे मी आहे, तेथे माझा सेवकही असेल. जो कोणी माझी सेवा करतो, त्याचा सन्मान माझा पिता करील.


मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी माझ्या पित्याकडून ऐक ले, ते सर्व मी तुम्हांला सांगितले आहे.


दास धन्यापेक्षा थोर नाही, हे जे मी तुम्हांला सांगितले, त्या वचनाची आठवण ठेवा. जर त्यांनी माझा छळ केला तर ते तुमचाही करतील. जर त्यांनी माझे वचन पाळले, तर ते तुमचेही पाळतील,


शौल, ज्याला पौल देखील म्हणत, पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला,


परंतु मी तर माझा प्राण कवडीमोल मानतो. माझी धाव आणि देवाच्या कृपेचे शुभवर्तमान घोषित करण्याची जी सेवा मला प्रभू येशूकडून प्राप्त झाली आहे ती मी पूर्ण करावी, एवढीच माझी इच्छा आहे.


त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायऱ्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले आणि अगदी शांत झाल्यावर हिब्रू भाषेत तो पुढीलप्रमाणे बोलला:


तेव्हा प्रभूने मला सांगितले, ‘जा, मी तुला यहुदीतरांकडे दूर पाठवतो.’”


मी जमिनीवर पडलो आणि ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस?’, अशी वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली.


अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःसाठी बोलावयास परवानगी आहे.” पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले:


आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात हिब्रू भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली, ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारून तू स्वतःलाच इजा करून घेतोस!’


कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी आराधना करतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,


परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा, परराष्ट्रीय, राजे व इस्राएलची प्रजा ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी त्याला निवडले आहे.


मला शुभवर्तमानाची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी, म्हणजेच प्रथम यहुदी व नंतर यहुदीतर माणसांसाठीदेखील, ते देवाचे तारणदायक सामर्थ्य आहे.


त्याच्याद्वारे मला कृपा व प्रेषितपदही मिळाले, अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे.


मी जे काही सांगत आहे ते खरे आहे, ह्याविषयी देव माझा साक्षीदार आहे. त्याच्या पुत्राचे शुभवर्तमान घोषित करून मी देवाची मनापासून सेवा करीत आहे.


यहुदीतरांकरता प्रेषित ह्या नात्याने मी सांगतो की, मी माझ्या सेवाकार्याचा अभिमान बाळगतो.


ती संधी अशी की, मी यहुदीतरांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे. देवाचे शुभवर्तमान घोषित करण्यासाठी एखाद्या याजकाप्रमाणे मी सेवा करतो अशासाठी की, यहुदीतरांनी पवित्र आत्म्याने पवित्र होऊन आपणास समर्पित करावे.


जेव्हा मी तुमच्याकडे येईन, तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन, हे मला ठाऊक आहे.


कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वार्थ साधू पाहतात. गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भावंडांची अंतःकरणे भुलवितात.


आपण देवाचा गौरव करू या. तुम्हांला तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास तो समर्थ आहे. येशू ख्रिस्ताविषयीचे जे शुभवर्तमान मी घोषित करतो त्यानुसार व जे रहस्य गत युगात गुप्त ठेवलेले होते, परंतु आता जे प्रकट करण्यात आले आहे त्यानुसार तो हे करीत आहे.


करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यासाठी बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना,


मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेले नाही काय? प्रभूमध्ये केलेल्या सेवाकार्याचे फळ मला तुमच्यामध्ये दिसत नाही काय?


देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमथ्य ह्यांच्याकडून:करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांस शुभेच्छा.


परमश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही, असे मी मानतो.


तुम्ही महान व्हावे म्हणून मी स्वतःला लीन करून देवाचे वचन विनामूल्य तुम्हाला सांगितले, हे मी पाप केले काय?


मी मूढ बनलो. असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले. माझी शिफारस तुम्ही करावयाची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या परमश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही हलक्या दर्जाचा नाही.


असो, मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी त्रोवस येथे आल्यावर माझ्यासाठी प्रभूने दार उघडले.


कारण आम्ही स्वतःची घोषणा करत नाही. तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशूसाठी आम्ही तुमचे सेवक आहोत, अशी घोषणा आम्ही करतो.


मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाद्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले तो देवपिता, ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधूंकडून: गलतीया येथील ख्रिस्तमंडळीला


येशूमधील जीवनात विश्वासू असणाऱ्या इफिस येथील पवित्र लोकांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून:


तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीचे शुभवर्तमान ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्यामध्ये ठसा उमटविण्यात आला आहे.


आणि त्यानेच काहींना प्रेषित, काहींना संदेष्टे, काहींना शुभवर्तमानप्रचारक, काहींना पाळक व शिक्षक असे नेमले.


फिलिप्पै येथील बिशप व दीक्षित सेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूमध्ये श्रद्धा असणाऱ्या सर्व पवित्र लोकांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथ्य ह्यांच्याकडून:


आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, असे कबूल करावे.


कलस्सै येथील पवित्र लोकांना म्हणजे ख्रिस्तामधील श्रद्धावंत बंधुजनांना देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून:


देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी ख्रिस्तमंडळींचा प्रसेवक झालो आहे.


पूर्वी फिलिप्पै येथे आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, तीव्र विरोधाला तोंड देत असतानाही देवाचे शुभवर्तमान तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले, हे तुम्हांला माहीतच आहे.


आम्हांला तुमच्याविषयी जिव्हाळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हांला केवळ देवाच्या शुभवर्तमानाचे दानच देण्यास नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या गाढ प्रीतीमुळे तुमच्याकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो.


बंधुंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे. तुमच्यातील कुणावर आमचा भार पडू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा केली.


देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा ह्यांच्या आदेशानुसार ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून, विश्वासातील माझे एकनिष्ठ लेकरू तीमथ्य ह्याला:


आणि ह्याकरिता मला संदेशहर व प्रेषित आणि यहुदीतरांसाठी श्रद्धा व सत्याच्या बाबतीत शिक्षक नेमण्यात आले होते.


मला यहुदीतर लोकांसाठी प्रचारक, प्रेषित व शिक्षक म्हणून नेमले आहे.


देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी व त्यांना आपल्या धार्मिक सत्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला निवडण्यात व पाठविण्यात आले.


प्रमुख याजकपदाचा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनप्रमाणे पाचारण केले आहे, त्याला तो मिळतो.


असाच आपला प्रमुख याजक असणे योग्य होते; तो भक्तिमान, निर्दोष, शुद्ध व पापी जनांपासून वेगळा असताना आकाशांच्या पलीकडे त्याचा गौरव करण्यात आला.


बारा वंशांतील जगभर पांगलेल्या सर्व लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक याकोब ह्याच्या शुभेच्छा.


देवाच्या प्रजेपासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे, तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या शुभवर्तमानाचा अवमान करणाऱ्याबरोबर त्याचा शेवट कसा होईल?


येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून: आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना,


देवपित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्ताच्या संरक्षणाखाली असलेले व देवाने आमंत्रित केलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा सेवक व याकोबचा बंधू यहूदा ह्याच्याकडून:


येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण:ज्या गोष्टी लवकरच जरूर घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्याने आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहान ह्याला हे कळविले.


नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना स्वतःचा पवित्र आत्मा देणारा देवप्रभू ह्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्याच्या सेवकांना कळविण्यासाठी त्याच्या दूताला पाठविले आहे.”


परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. तू, संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. देवाची आराधना कर!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan