Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 9:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, लैंगिक अनैतिकता व चोऱ्या यांच्याबद्दलही पश्चाताप केला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, ‘चेटके, जारकर्म व चोर्‍या’ ह्यांबद्दलही पश्‍चात्ताप केला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आणि त्यांनी केलेल्या खुनाविषयी जादूटोणा, व्यभिचार व चोऱ्या ह्यांबद्दलहि पश्चात्ताप केला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तसेच, त्यांनी केलेले खून, चेटके, जारकर्म, त्यांच्या चोर्‍या या पापांबद्दल पश्चात्ताप केला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 9:21
24 Iomraidhean Croise  

अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार आणि लैंगिक अनैतिकता, तसेच चोऱ्या, खोट्या साक्षी व निंदानालस्ती निघतात.


मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहावयास लावील आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण केलेल्या अनैतिक गोष्टींचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला अश्रू ढाळावे लागतील.


मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, मत्सर, राग, भांडणतंटे, फुटिरता, पक्षभेद,


ह्या दुसऱ्या श्वापदाने मोठेमोठे चमत्कार केले. माणसांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असेदेखील त्याने केले.


पहिल्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली होती, ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीची आराधना करणार नाहीत ते ठार मारले जावेत, असे तिने घडवून आणावे.


पवित्र लोकांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली. सर्व वंश, लोक, भाषा बोलणारे आणि राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला.


त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “तिचे पतन झाले! महान बाबेलचे पतन झाले! तिने आपल्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना प्यायला लावला.”


त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे रक्त पाडले आणि तू त्यांना रक्त प्यावयास लावले आहे. हीच त्यांची योग्यता आहे!”


तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरूपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले.


ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली होती. आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता.


तिच्या कपाळावर “महान बाबेल, वेश्यांची व पृथ्वीवरील विकृतीची आई”, हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते.


कारण तिच्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अमर्याद विषयभोगाने धनवान झाले.”


कारण त्याचे न्याय सत्याचे व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्यायविवाडा त्याने केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.


परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”


विकृत जन, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, शब्दाने व कृतीने लबाडी करणारे सर्व लोक ह्या नगरीच्या बाहेर राहतील.


त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या दैवतांची पूजा करणे त्यांनी सोडले नाही


Lean sinn:

Sanasan


Sanasan