Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 8:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तेव्हा देवदूताने धूपपात्र घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला. मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूकंप झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा देवदूताने ‘धुपाटणे’ घेऊन त्यात ‘वेदीवरचा अग्नी भरून’ पृथ्वीवर टाकला आणि ‘मेघांचा गडगडाट व गर्जना’ झाल्या, ‘विजा’ चमकल्या व भूमिकंप झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यामध्ये वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूमिकंप झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा त्या देवदूताने वेदीवरील अग्नी धूपदाणीत भरून घेतला आणि त्याने खाली पृथ्वीवर टाकला. त्याबरोबर मोठा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या आणि प्रचंड भूमिकंप झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 8:5
24 Iomraidhean Croise  

राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील.


मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आत्तापर्यंत पेटली असती तर किती बरे झाले असते!


तेव्हा एकाएकी भयंकर भूकंप झाला आणि तुरुंगाचा पाया डगमगला. सर्व दरवाजे तत्काळ उघडले व सर्वांच्या बेड्या तुटल्या.


त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेवर ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने घोषित करू लागले.


त्याच घटकेस भीषण भूकंप झाला. तेव्हा त्या शहराच्या दहाव्या भागाचा विध्वंस झाला. भूकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीचे भयभीत होऊन त्यांनी स्वर्गातील देवाचा गौरव केला.


देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले आणि त्याच्या मंदिरात त्याच्या कराराची पेटी दृष्टीस पडली, त्यानंतर विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले, भूकंप झाला व गारांची महावृष्टीही झाली.


राजासनाकडून विजा, गडगडाट व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या सात मशाली राजासनापुढे जळत होत्या, त्या मशाली म्हणजे देवाचे सात आत्मे आहेत.


कोकराने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा भीषण स्वरूपाचा भूकंप झाला. सूर्य केसांच्या गोणपाटासारखा काळा झाला व पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला.


आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धूपपात्र होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धुपारती करण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan